• Decrease
  • Normal
  • Increase

Current Size: 100%

थीमनिळी थीम केशरी थीम हिरवी थीम | मानक प्रखरता तीव्र प्रखरता

भाषा

मुख्य मेनू

India Government

आरे लोगो

आरे लोगो

आयुक्त कार्यालयातील लोगो

आयुक्त कार्यालयातील लोगो

मा. डी. ऐन खुरोडी

मा. डी. ऐन खुरोडी दुग्ध क्रांतीचे प्रणेते मॅगँसेस अवॉर्ड विजेते

डॉ. वर्गीस कुरियन

डॉ. वर्गीस कुरियन, भारतातील दूध क्रांतीचे जनक

आरे सरिता

आरे सरिता

आयुक्तालय

आयुक्तालय

आरे शक्ती गाय दूध

आरे शक्ती गाय दूध

मा.माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन

मा.माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांची आरे शक्ती गाय

माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन

मा.माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांची आरे शक्ती गाय दूध वसाहत

आरे दूध उत्पादन

आरे दूध उत्पादन

दुग्धशाळा विज्ञान संस्था

दुग्धशाळा विज्ञान संस्था

 डेन्सीटी मीटर

डेन्सीटी मीटर

आरे दूध उत्पादन

आरे दूध उत्पादन

न्यूझीलंड वसतिगृह

न्यूझीलंड वसतिगृह

वरळी दुग्धशाळा

वरळी दुग्धशाळा

previous pauseresume next
दुग्धव्यवसाय विकास विभाग
स्वागत
विभागाची ओळख
  • मुंबई शहरातील नागरिकाना निर्जंतुक केलेले दूध उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सन १९५१ साली आरे दुग्धवसाहत, मुंबई येथे आशियातील पहिली दुग्धशाळा उभारण्यात आली.
  • संपूर्ण राज्यामध्ये दुग्धव्यवसाय विकसित करण्यासाठी आवश्यक संरचना उभारणीसाठी शासनाचा स्वतंत्र दुग्धव्यवसाय विभाग सन १९५८ साली स्थापन करण्यात आला. या विभागाच्या प्रमुखांना दूध आयुक्त (Milk Commissioner) असे संबोधण्यात येत असे.
  • तदनंतर या विभागामार्फत राज्यात गरजेनुसार ३८ दुग्धशाळा व ८१ शीतकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली.
  • १९६० मध्ये राज्यातील प्रति दिन सरासरी दूध संकलन १ लाख लिटर्स इतके होते, ते सन २०१५ - २०१६ या वर्षामध्ये ११४ लाख लिटर प्रति दिन इतके वाढले आहे.
  • दुग्धव्यवसाय हा शेतीचा जोडधंदा म्हणून केला जातो. ग्रामीण भागात उत्पादित केलेले दूध शहरी ग्राहकांना रास्त दराने पुरविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. या करीता महाराष्ट्र राज्यात दुधाचे संकलन, वाहतूक, प्रक्रिया, पॅकेजींग करण्या करीता सुविधा निर्माण केल्या आहेत. ग्रामीण भागातील दुधाचे संकलन करून ते शहरी भागात आणण्यासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून गाव पातळीपासून शासकीय दूध योजने पर्यत एक साखळी निर्माण करण्यात आली. गाव स्तरावर प्राथमिक सहकारी दूध संस्था, तालुका व जिल्हा स्तरावर दूध संघ व त्यांच्या मार्फत शासनाकडे दूध पुरवठा अशा तऱ्हेची ही साखळी होती. १९६० पर्यत फक्त मुंबईसाठी असलेले शासकीय दूध वितरण हळूहळू महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्ये सुद्धा सुरु करण्यात आले. त्यात प्रामुख्याने पुणे, नागपूर, नाशिक ई. शहरांचा समावेश होता.
  • सन १९७५-७६ साली राज्यातील दुधाचे संकलन सुमारे ६.४० लाख लिटर प्रतिदिन होते आणि  त्यात वाढ होऊन सन १९८४-८५ च्या काळामध्ये १७.४० लाख लिटर प्रतिदिन झाले आहे. ग्रामीण भागातून दुध संकलन करण्यासाठी गाव स्तरावर प्राथमिक सहकारी संस्था, तालुका आणि जिल्हा स्तरावर सहकारी दुध संघ आणि त्यांच्यामार्फत होणारी शासनाकडील दुध स्विकृती अशा तऱ्हेची एक साखळी निर्माण करण्याच्या दृष्टीने जिल्हा स्तरावर जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी या पदाची निर्मिती १९७८ साली करण्यात आली. तसेच त्यांना मदत करण्यासाठी सहाय्यक जिल्हा दुग्धविकास अधिकारी आणि सहनिबंधक (सहकारी संस्था) व इतर कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली.