दृष्टी आणि ध्येय
-
शेतीला जोड धंदा म्हणून पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायातील ग्रामिण जनतेचा पिढीजात कौशल्याचा व स्वाभाविक प्रवृत्तीचा विकास करणे.
-
गाव,तालुका व जिल्हा पातळीवर दूध उत्पादकांच्या सहकारी संस्था स्थापन करणे.
-
सहकारी क्षेत्रातील दुग्धव्यवसायास प्रोत्साहन देवून सहकारी दुग्धशाळांचे व संघांचे बळकटीकरण करणे व त्यास नियोजित दुधाचा धंदा करण्यास सक्षम बनविणे.
-
राज्यामधील सहकार व खाजगी क्षेत्रामार्फत होणाऱ्या दुध संकलन व वितरण यांचा आढावा घेणे.
-
शहरातील नागरिकांना सतत निर्भेळ व सकस दुधाचा पुरवठा होण्यास प्रयत्नशिल रहाणे.
-
राज्य आणि केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे.