बंद

    राज्य पुरस्कृत योजना

    • तारीख : 07/04/2025 -

    1. जिल्हा वार्षिक योजना.

    जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वेळोवेळी निर्गमीत करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार खालील प्रकारे उद्येश ठरविण्यात आलेला आहे.

    1. प्राथमिक दुध संस्थांचे बळकटीकरण करणे.

    2. सहकारी दुध उत्पादक संस्था/संघांना संगणक सचिव / बल्कमिल्क कुलर्स व कॅन, भेसळ तपासणी किट इ. साहित्य खरेदीसाठी अनुदान देणे.

    3. दुध व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी सयंत्र पुरविणे.४. दुग्धजन्य पदार्थ साठवणूकीसाठी 10 ते 50 मे.टन क्षमतेचे शितग्रह उभारणी 5 दुध साठवणुकी करीता स्टोरेज टैंक पुरवठा.

    4. महिला स्वयंसहाय्यता बचत गट / शेतकरी उत्पादक कंपनी यांना बल्क मिल्क कुलर्ससाठी उभारणीसाठी सहाय्य करणे.

    मार्गदर्शक तत्वे.

    सदर योजनेचा सहकारी दुध उत्पादक संघ अथवा संस्थेला याचा लाभ होऊ शकतो. सविस्तर प्रकल्प अहवाल व मार्गदर्शक तत्वानुसार कागदांची पुर्तता करणे आवश्यक.

    शासन निर्णय :-

    1. शासन निर्णय क्रं. एमएलके-2010/प्र.क्र.222/पदुम-8 दि. 08.12.2011
    2. शासन निर्णय एमएलके-2021/प्र.क्र.256/पदुम-8 दि. 23.12.2022, नुसार राज्यातील सहकारी दुध उत्पादक संघ / संस्था यांना शासन निर्णयात नमुद केलेल्या घटकासाठी 50 ते 75% अनुदान देणे. शासन निर्णय एमएलके-2021/प्र.क्र.256/पदुम-8 दि.27.07.2023 च्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत एकात्मिक दुग्धविकास कार्यक्रमांतर्गत राज्यातील पात्र महिला स्वयंसहाय्यता गट / एफपीओ यांना बल्क मिल्क कुलर्स 50 ते 75% अनुदान तत्वावर देण्याबाबत आदेश आहेत.

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    जिल्हा वार्षिक योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्या-त्या जिल्ह्याचे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांच्याकडे दूध उत्पादक सहकारी संस्था सहकार दुध उत्पादक संघ, स्वयंसहाय्यता बचत गट या लाभधारकांनी सविस्तर डिपीआरसह प्रस्ताव सादर करावा. सदर अर्जासोबत लाभार्थी संस्थेचे हमीपत्र, संस्थेचा लेखापरिक्षण अहवाल. संस्था/संघाचे निधी उभारणी आर्थिक क्षमतेबाबत हमीपत्र व मार्गदर्शक तत्वानुसार कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे. सदर योजनेत संघाला/संस्थेला 50 ते 75% अनुदान देण्यात येते.