राष्ट्रीय कृषी विकास योजना. (आर.के.व्ही.वाय.)
राष्ट्रीय कृषी विकास योजना (आर.के.व्ही.वाय.) योजनेंतर्गत निर्गमीत केलेल्या मार्गदर्शन सुचनेनुसार उत्पादन व वृध्दी, पायाभूत सुविधा व साधन सामुग्री विशेष योजना व परिवर्तनशिल निधी या घटकामार्फत केंद्र व राज्यशासनाच्या अनुक्रमे 60:40 प्रमाणात अर्थसहाय्याने संघाला / संस्थेला 50% व खाजगी प्रकल्पास 25% अनुदान देण्यात येते.त्यासाठी खालील प्रकारे उद्येश ठरविण्यात आलेला आहे.
- दूध संकलन केंद्र व पायाभूत सोयीसह अद्यावत दुग्धशाळा उभारणी.
- दुग्धशाळा विस्तारीकरण.
- दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी अर्थसहाय्य.
- शितकरण / दुग्धशाळा मधील प्रयोगशाळेचे बळकटीकरण.
मार्गदर्शक तत्वे.
- सदर योजनेचा सहकारी दुध उत्पादक संघ / संस्थेला / एफपीओ तसेच खाजगी प्रकल्पास याचा लाभ होऊ शकतो. सविस्तर प्रकल्प अहवाल व मार्गदर्शक तत्वानुसार कागदांची पुर्तता करणे आवश्यक.
- शासन निर्णय.राष्ट्रीय कृषी विकास योजना मार्गदर्शक तत्वे कृषि मंत्रालय सन 2014 (12 वी पंचवार्षीक योजना)
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्या-त्या जिल्हयाचे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांच्याकडे सविस्तर डिपीआरसह प्रस्ताव सादर करावा. सदर अर्जासोबत संस्था/संघाचे निधी उभारणी बाबतचे हमीपत्र आर्थिक क्षमतेबाबत बँक गॅरंटी व मार्गदर्शक तत्वानुसार कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे. सदर योजनेत संघाला / संस्थेला 50% अनुदान व खाजगी प्रकल्पास 25% देण्यात येते. केंद्र शासनाचे दि.31/1/2022 रोजीच्या पत्रान्वये पदुम विभागाचे प्रस्ताव सन 2022-23 पासून पुढे अर्थसहाय्यासाठी स्विकारले जाणार नसल्याचे कळविले आहे.