बंद

    परिचय

    गोरेगाव (पूर्व) येथील आरे मिल्क कॉलनीची स्थापना 1949 मध्ये झाली आणि 1951 मध्ये आरे येथील डेअरीचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले.

    इतिहासातील एक क्षण

    भारताचे माजी पंतप्रधान, पंडित जवाहरलाल नेहरू, रोप लावताना. हे छायाचित्र ४ मार्च १९५१ रोजी आरे कॉलनीच्या उद्घाटनावेळी काढले गेले होते.

    पार्श्वभूमी

    शहरातील नागरिकांना निर्जंतुक दूध मिळण्याच्या उद्देशाने 1952 साली आशियातील पहिली दुग्धशाळा स्थापण्यात आली. दुग्धव्यवसाय विकास विभागाचे प्रमुख यांना दुग्ध आयुक्त असे संबोधण्यात येते. दुग्धव्यवसायाची प्रगती पूर्ण सक्षमतेने होण्यासाठी शासनाने स्वतंत्र दुग्धव्यवसाय विकास विभाग 1958 साली स्थापन केला. 1960 पासून ग्रामीण भागातील दूध स्वीकारून शहरी भागातील लोकांना दूध वितरीत करण्याची योजना सुरु करण्यात आली. तसेच इतर जिल्ह्यांमध्येसुद्धा शासकीय शीतकरण केंद्रे / दुग्धशाळा यांची स्थापना करण्यात आली.

    महाराष्ट्रात एकूण दूध उत्पादनाच्या टक्केवारीमध्ये गायीचे दूध उत्पादन म्हशीच्या दुधाच्या उत्पादनाच्या तुलनेत जास्त आहे. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये गायीच्या दुधाचे प्रमाण अधिक आहे. गायीच्या व म्हशीच्या दुधामध्ये स्निग्धांश व स्निग्धेतर घनघटकामध्ये फरक असतो. गायीच्या दुधामध्ये स्निग्धांशाचे व स्निग्धेतर घनघटकाचे प्रमाण सरासरी 3.5 / 8.5 इतके असते, तर हेच प्रमाण म्हशीच्या दुधामध्ये 6.0 / 9.0 इतके असते.