कर्तव्ये व जबाबदा-या

आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य 
आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास हे विभाग प्रमुख असून सर्व प्रशासकीय व वित्तीय अधिकार त्यांना प्राप्त आहेत. दुग्धव्यवसाय विकास विभागातील सर्व अधिकारी त्यांचे नियंत्रणाखाली कामकाज पाहतात. वर्ग-३ व वर्ग-४ मधील कर्मचा-यांचे नियुक्ती प्राधिकारी आहेत. तसेच दुग्धव्यवसाय विकास विभागाशी संबंधित धोरणात्मक बाबींमध्ये शासन सल्ला देणे.
आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास यांना ५ उप आयुक्त हे वरिष्ठ अधिकारी विभागाचे नियोजन, दूध उत्पादन, प्रक्रिया, गुणनियंत्रण, यांत्रिकी विषयक, दक्षता व प्रापण इत्यादी बाबींचे कामकाजात सहाय्य करतात. आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास यांच्या नियंत्रणाखली पुढील अधिकारी कामकाज पाहतात.
१.उप आयुक्त (प्रशासन) दुग्धव्यवसाय विकास विभाग 
सर्व प्रशासकीय काम, न्यायालयीन प्रकरणे, विभागीय चौकशी, अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा विषयक बाबी, जेष्ठता सूची, गोपनीय अहवाल तयार करणे, अस्थाई पदांचे प्रस्ताव तयार करुन शासनाकडून त्यांची मंजूरी घेणे तयेच विभागातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यास आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास यांना सहाय्य करण्याचे काम उप आयुक्त (प्रशासन), दुग्धव्यवसाय विकास विभाग हे करतात. उप आयुक्त (प्रशासन) यांना सहाय्य करण्यासाठी खालील अधिका-यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

i) सहाय्यक आयुक्त (प्रशासन), दुग्धव्यवसाय विकास विभाग
उप आयुक्त (प्रशासन) यांना प्रशासकीय कामात सहाय्य करणे, अधिकारी आणि वर्ग-३ व वर्ग -४ मधील कर्मचा-यांचे सेवा विषयक अभिलेख तयार करणे.

ii) सहाय्यक आयुक्त (सर्वसाधारण), दुग्धव्यवसाय विकास विभाग
उप आयुक्त (प्रशासन) यांना सर्वसाधारण प्रशासकीय कामात सहाय्य करणे, उदाहरणार्थ नोंदणी शाखेशी संबंधित कामावर नियंत्रण ठेवणे, लेखन सामुग्री इ. खरेदी करणे, आवक-जावक विभागावर नियंत्रण ठेवणे, साठा नोंदवही अद्यावत ठेवणे, वर्ग-४ मधील कर्मचा-यांवर नियंत्रण ठेवणे.

२.उप आयुक्त (वित्तीय सल्लागार) दुग्धव्यवसाय विकास विभाग 
विभागाचे अर्थसंकल्प तक्रार करणे, विभागाच्या जमा-खर्च वर नियंत्रण ठेवणे, चारमाही/ आठमाही व वार्षिक अर्थसंकल्पाचे प्रस्ताव तयार करणे आणि लोकलेखा समिती व भारताचे नियंत्रक व महालेखाकार यांच्याकडून प्राप्त परिच्छेदांचे उत्तर तयार करुन देणे. उप आयुक्त (वित्तीय सल्लागार), दुग्धव्यवसाय विकास विभाग यांना सहाय्य करण्यासाठी खालील अधिका-यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
i) सहाय्यक आयुक्त (अंतर्गत लेखा परिक्षण), दुग्धव्यवसाय विकास विभाग 

विभागाचे अंतर्गत लेखा परिक्षण संबंधी कामकाजावर नियंत्रण ठेवणे, लेखा परिक्षण परिच्छेदांसंबंधी कार्यवाही करणे.

ii) अर्थसंकल्पीय अधिकारी 
वार्षिक अर्थसंकल्प तयार करण्याची काम करणे, तसेच अर्थसंकल्प तयार करण्यासाठी वित्तीय सल्ला देणे.

iii) लेखा अधिकारी
सहाय्यक आयुक्त (अंतर्गत लेखा परिक्षा) दुग्धव्यवसाय विकास विभाग यांना सहाय्य करणे तसेच मुंबई विभागाचे लेखा परिक्षण करणे.

iv) सहाय्यक आयुक्त (लेखा), दुग्धव्यवसाय विकास विभाग 
आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास विभाग यांच्या कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांच्या वेतन, भत्ता इ. अदा करण्यायाबाबतची कार्यवाही करणे व सेवा पुस्तके इ. अद्यावत करणे व सुधारित ठेवण्याची कामे.

v) खर्चमेळ अधिकारी 
अर्थसंकल्पीय अधिकारी यांना अर्थसंकल्प तयार करण्यास मदत करणे, विभागाचे खर्च मेळ तयार करणे.

३.उप आयुक्त (उत्पादन व प्रापण), दुग्धव्यवसाय विकास विभाग 
दुग्ध उत्पादन व त्याची विल्हेवाट लावण्याबाबत नियोजन करणे, दूध खरेदी/ विक्रीचे दर ठरविणेबाबतची प्रस्ताव तयार करुन शासन सादर करणे, दूध संस्था/ संघ यांच्या अडीअडचणी व तक्रारींवर कार्यवाही करणे, दूध शितकरण केंद्र/ दुग्धशाळा हस्तांतरणबाबतचे प्रस्ताव तयार करणे व शासनास सादर करुन त्यानुसार कार्यवाही करणे.
उप आयुक्त (उत्पादन व प्रापण) यांना सहाय्य करण्यासाठी खालील अधिका-याची नेमणूक करण्यात आलेली आहे.
i) दुग्धशाळा व्यवस्थापक (मुख्यालय) 
नवीन दुध योजना सुरु करण्याचे प्रस्ताव तयार करुन उप आयुक्त (उत्पादन व प्रापण) दुग्धव्यवसाय विकास विभाग यांच्यामार्फत आयुक्त दुग्धव्यवसाय विकास यांना सादर करणे, के. एफ. ए. अहवाल तयार करणे, सहकारी दुग्ध संस्था/ संघ यांचेशी संबंधित कामकाज व त्याअनुषंगाने येणारी प्रकरणांचे निपटारा करणे, केंद्र व राज्य सरकार कडून सुरु करण्यात येणा-या नवीन योजना कार्यान्वित करणे,स्वच्छ दुध उत्पादन इ. पंचवार्षिक योजनेचा प्रस्ताव तयार करणे.

ii) भूसर्व्हेक्षण अधिकारी 
दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या अखत्यारीतील जमिनी अद्यावत माहिती उप आयुक्त (उत्पादन व प्रापण) यांना सादर करणे, विभागाच्या अखत्यारीतील जमिनीची अद्यावत नोंद ठेवणे, त्याची मोजमाप करण्याची कामे करणे व त्याचा अहवाल योग्य त्या कार्यवाहीसाठी उप आयुक्त (उत्पादन व प्रापण) यांना सादर करणे.

४.उप आयुक्त (प्रक्रिया व वितरण), दुग्धव्यवसाय विकास विभाग 
दुध व दुग्धजन्य पदार्थाचे वितरण करण्यासंबंधी कार्य योजना तयार करणे, विक्री किंमत ठरविण्याबाबत प्रस्ताव सादर करणे, दुग्धशाळा आणि दूध भूकटी प्रकल्पांमध्ये समन्वय ठेवणे, दूध वाहतूकी संबंधी प्रकरणे हाताळणे, दूध वाहतूक ठेकेदारांचे तक्रारीचे निवारक करणे, अतिरिक्त दूधाची ठोक विक्री, त्यांची दूध भूकटी आणि सफेद लोणी मध्ये रुपांतरण आणि त्याची विक्री संबंधी योग्य कार्यवाही करणे, दूध भेसळबाबत प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे, शासकीय दूध केंद्र, आरे सरिता इ. वर अचानक भेट देणे आणि दूध वितरणासंबंधी योग्य ती कार्यवाही करणे.
उप आयुक्त (प्रक्रिया व वितरण) दुग्धव्यवसाय विकास विभाग यांना सहाय्य करण्यासाठी खालील अधिका-यांची नेमणूक केलेली आहे.

i) सहाय्यक आयुक्त (गुण नियंत्रण), दुग्धव्यवसाय विकास विभाग 
दुध भेसळीबाबत प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे, दूधाची गुणप्रत तपासणी करणे, उदाहरणार्थ स्निग्ध व स्निगधांश दूध व दुग्धजन्य पदार्थ आदेश- ९२ या अधिनियमानुसार खाजगी/सहकारी/ शासकीय दूध प्रकल्पांचे पंजीकरण संबंधी प्रस्ताव तयार करुन सादर करणे, दुध व दुग्धजन्य पदार्थ आदेश-९२ अंतर्गत पंजीकृत प्रकल्पाच्या विरुध्द नियमाधीन कारवाई करण्याबाबत प्रस्ताव सादर करणे, दुधाची गुणवत्ता सुधारणेबाबत सल्ला देणे तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थाचे वितरण वाढविण्यासाठी कार्य योजना तयार करणे.

ii) परिवहन अधिकारी 
विभागाअंतर्गत सर्व कार्यालयांकडील वाहनांवर नियंत्रण ठेवणे,वाहन अपघात व दुरुस्ती
प्रकरणे हाताळणे,वेळोवेळी होणा-या डिसेल दर वाढी फरकाचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करणे, आयुक्त कार्यालयातील वाहन व वाहन चालक यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

५.उप आयुक्त (दुग्धशाळा अभियांत्रिकी), दुग्धव्यवसाय विकास विभाग 
दुग्धव्यवसाय विकास विभागाअंतर्गत सर्व शासकीय दुध योजना आणि दूध शितकरण केंद्राची यंत्र सामुग्री आणि प्रकल्पांची देखभाल, दुरुस्ती इ.ची कामे, जबाबदारी पार पडणे व त्या अनुषंगाने दुरुस्ती व देखभाल बाबत कार्यवाही करणे, आयुक्त दुग्धव्यवसाय विकास विभाग यांना शासकीय दुध योजनेतील यंत्र सामुग्री व प्रकल्पामध्ये आवश्यक ती उपाय योजना करण्याचा तांत्रिक सल्ला देणे. उप आयुक्त (दुग्धशाळा अभियांत्रिकी) दुग्धव्यवसाय विकास विभाग यांना सहाय्य करण्यासाठी खालील अधिका-याची नेमणूक करण्याच्या आलेली आहे.

i) दुग्धशाळा अभियंता 
शासकीय दूध योजना, दुग्धशाळा दूध शितकरण केंद्रातील यंत्र सामुग्रीची दुरुस्ती व देखभाल करणे, त्याअनुषंगाने तांत्रिक प्रकरणाचा प्रस्ताव सादर करणे, दुग्धशाळा व दूध शितकरण केंद्रासाठी नवीन यंत्र सामुग्री खरेदी करण्याचे प्रस्ताव तयार करणे.

ii) सहायक दुग्धशाळा अभियंता
दुग्धशाळा अभियंता यांना तांत्रिक बाबींमध्ये सहाय्य करणे, दुग्धशाळेतील यंत्र सामुग्री व प्रकल्पाची दुरुस्ती व देखभाल करण्यासंबंधी आवश्यक तो प्रस्ताव तयार करुन दुग्धशाळा अभियंता यांना सादर करणे.

६.सह निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) 
दूध सहकारी संस्थांना मार्गदर्शन देणे, त्यांचा कामकाज वर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे, दूध सहकारी संस्थांना भेट देवून त्यांचा कामकाजाचे निरीक्षण करणे, त्यांचा कामकाजासंबंधी तक्रारीची चौकशी करणे, दूध सहकारी संस्था/ संघ यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छाननी करुन त्यांचा प्रस्ताव वित्तीय संस्थांना शिफारशीसह सादर करणे, अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी दूध सहकारी संस्थांना वित्तीय सहायता प्रदान करण्याबाबतचा प्रस्तावा तयार करुन सादर करणे, दूध सहकारी संस्थाच्या कामकाज सुरळीतपणे चालविण्यासाठी प्रभावी धोरणात्मक दिशा-निर्देश देणे, सहकारी दूध संस्थांचे नियोजन लेखा परिक्षण करणेबाबतची कार्यवाही करणे.

i) उप निबंधक सहकारी संस्था 
सहकारी दूध संस्थाशी संबंधित तक्रारीचे तपास करणे, धोरणात्मक दिशा निर्देश करण्यासाठी सह निबंधक सहकारी संस्था यांना सहाय्य करणे, सहकारी दूध संस्थाचे नियमित लेखा परिक्षण करण्याबाबतची कार्यवाही करणे.

७.जनसंपर्क अधिकारी 
जनसंपर्क अधिकारी विभागाचा प्रवक्ता म्हणून कार्य करीत असतो. सामान्य जनतेला विभागाचा कामकाजासंबंधी माहिती देणे, जनतेकडून प्राप्त होणा-या तक्रारींची निवारण करणे, विधानमंडळ अधिवेशनातील कामकाजामध्ये समन्वय साधण्याचे काम करणे.

८.मुख्य दक्षता अधिकारी 
दुग्धव्यवसाय विकास विभागाअंतर्गत सर्व शासकीय दूध योजना व दूध शितकरण केंद्राची सुरक्षा संबंधी प्रकरणांची जबाबदारी मुख्य दक्षता अधिकारी यांची आहे. विभागातील अधिकारी/ कर्मचा-यांविरुध्द प्राप्त झालेल्या तक्रारी व भ्रष्टाचार विषयक प्रकरणाचा तपास करुन त्याचा अहवाल आयुक्त दुग्धव्यवसाय विकास विभाग यांना सादर करणे, सर्व शासकीय दूध योजना, शितकरण केंद्रावर अचानक भेट देवून तपासणी करणे, सुरक्षा विभागातील अधिकारी / कर्मचा-यांवर नियंत्रण ठेवणे.

i) उप मुख्य दक्षता अधिकारी 
कामगार / कर्मचा-यांकडून प्राप्त होणा-या तक्रारी व भ्रष्टाचार संबंधी प्रकरणांची चौकशी करुन त्याचा अहवाल मुख्य दक्षता अधिकारी यांना सादर करणे, दुग्धशाळा/दुग्ध शितकरण केंद्रावर अचानक भेट देणे, प्रकरणांचा तपास करुन त्याचा अहवाल सादर करणे, दुध वाहतूक करणा-या वाहनाची तपासणी करणे आणि दूध केंद्रावर अचानक भेट देवून तपास करणे.

९.सहाय्यक आयुक्त (सामुग्री) 
दुग्धशाळेला लागणारी सामुग्री खरेदी करण्यासाठी आयुक्त दुग्धव्यवसाय विकास यांना सहाय्य करणे .त्या संबंधी निवासी लेखा परिक्षण अधिका-याने उपस्थित केलेल्या लेखा परिच्छेदांचे निराकरण करणे व त्या अनुषंगाने येणा-या न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा करणे.

१०.स्वीय सहाय्यक 
आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास यांचा दैनंदिन कामातील अद्यावत माहिती व नोंद ठेवणे. दूध संकलन, वितरण, प्रापण व रुपांतरण इ. शी संबंधित माहिती आयुक्त यांना देणे, आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास यांना भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीची अद्यावत नोंद ठेवणे आणि आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास यांना लागणा-या माहिती संबंधितांकडून प्राप्त करुन अवलोकानार्थ ठेवणे.

प्रादेशिक विभाग स्तरावरील अधिकारी
प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी 
प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी त्या विभागाअंतर्गत कार्यरत कार्यालये आणि शासकीय दूध योजनांसाठी प्रादेशिक प्रमुख म्हणून काम पाहतात, प्रादेशिक स्तरावरील दूध उत्पादन, प्रक्रिया व वितरण इ. कामाचे पर्यवेक्षकीय कामे, दूध उत्पादकांना नियमितपणे दूधाची रक्कम अदा करण्याबाबची कार्यवाही करणे. प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांना सहाय्य करण्यासाठी खालील अधिका-यांची नेमणूक केलेली आहे.

i) प्रादेशिक दुग्धशाळा अभियंता 
प्रादेशिक विभागाअंतर्गत दुग्धशाळा व शितकरण केंद्र येथील यंत्र सामुग्री व आणि प्रकल्पाची दुरुस्ती व देखभाल विषयक कामे, व त्या अनुषंगाने प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांना तांत्रिक प्रकरणामध्ये सल्ला देणे.

ii) उप दुग्धशाळा अभियंता 
दुग्धशाळा अभियंता यांना तांत्रिक प्रकरणामध्ये सहाय्य करणे, दुग्धशाळेतील यंत्र सामुग्री आणि प्रकल्पाची दुरुस्ती व देखभालीची कामे व त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करुन दुग्धशाळा अभियंता यांना सादर करणे.

iii) वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी 
प्रादेशिक स्तरावरील अधिकारी/ कर्मचा-यांची विभागीय चौकशीची संबंधित प्रकरणे, पदोन्नतीबाबतची प्रकरणे, बदली/पदस्थापना इ. प्रकरणे हाताळणे आणि प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांना प्रशासकीय कामात सहाय्य करणे.

iv) सहाय्यक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी 
दूध प्रक्रिया व वितरणासंबंधी कामात प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांना सहाय्य करणे, ग्राहकांना स्वच्छ, निर्भेळ व चांगल्या प्रतीची दूध उपलब्ध करुन देण्याकरिता विविध दुग्धशाळा व शितकरण केंद्राना अचानक भेट देणे व तेथील कामकाजाची पहाणी करुन त्या अनुषंगाने आवश्यक त्या कार्यवाहीसाठी प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांना अहवाल सादर करणे.

v) उप निबंधक 
सहकारी दूध संस्था/ संघ यांच्या तक्रारी/अडीअडचणीची छाननी करणे व त्यानुसार धोरणात्मक दिशा निर्देश देण्यासंबंधी कामात प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांना सहाय्य करणे, सहकारी दूध संस्थांचे नियमित लेखा परिक्षण करणे व त्या अनुषंगाने येणारी कामे.

vi) लेखा अधिकारी 
प्रादेशिक स्तरावरील कार्यालयातील अधिकारी/ कर्मचा-याची वेतन व भत्ते अदा करणे, त्यांचे सेवापुस्तक व सेवा विषयक अभिलेख तयार करणे.

vii) लेखा अधिकारी (अंतर्गत लेखा परिक्षण) 
प्रादेशिक स्तरावरील अंतर्गत लेखा परिक्षण संबंधी कामे व लेखा परिच्छेदांचे उत्तर तयार करुन देणे.

जिल्हा स्तरावरील अधिकारी 
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी 
सहकारी दूध संस्थांचे नोंदणी करणे, सहकारी दूध संस्थांकडून दूधाची स्वीकृती, प्रक्रिया व वितरण संबंधी कामे व त्यांना मिळणा-या रक्कमेची अदायगी सुनिश्चित करणे. जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांना सहाय्य करण्यासाठी खालील अधिका-यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

i) सहाय्यक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी
सहकारी दूध संस्थांची पहाणी करणे, सहकारी दूध संस्थांकडून दूधाची स्वीकृती, प्रक्रिया, वितरण व देयकाची अदायगी संबंधी कामात जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांना सहाय्य करणे.

ii) सहा. निबंधक 
सहकारी दूध संस्थांचे पंजीकरण संबंधी कामकाज हाताळणे, सहकारी दूध संस्थांचे नियमित लेखा परिक्षण संबंधी काम करणे, सहकारी दूध संस्थांची पहाणी करणे, शासनाकडून प्राप्त होणा-या दिशा निर्देशाची अमंलबजावणी करण्यासंबंधीच्या कामात उप निबंधक सहकारी संस्था यांना सहाय्य करणे.

दुग्धशाळा आखणी/ रचना 
महाव्यवस्थापक 
ज्या दुग्धशाळेमार्फत ५०,००० लीटर किंवा पेक्षा जास्त दुधाची हाताळणी केली जाते. त्या दुग्धशाळेसाठी महाव्यवस्थापक अशी पदे निर्माण करण्यात आलेली आहे.
सध्या खालील ठिकाणी महाव्यवस्थापक या पदावरील अधिकारी कार्यरत आहेत.

महाव्यवस्थापक, बृहन्मुंबई दूध योजना 
बृहन्मुंबई दूध योजनाचे प्रमुख म्हणून आरे/वरळी/कुर्ला दुग्धशाळेतील दूध संकलन, वितरण, दूध संस्थाचे देयके अदा करणेबाबत, कामकाजात सुधारणा करण्यासाठी आवश्यक ती उपाय योजना तयार करणे, दुग्धशाळांना अचानक भेट देणे, अधिकारी/कर्मचारी यांना प्रशासकीय व तांत्रिक बाबींत मार्गदर्शन करणे आणि क्षेत्रीय प्रमुख म्हणून सर्व प्रशासकीय अधिकार महाव्यवस्थापक, बृहन्मुंबई दूध योजना यांना प्रदान करण्यात आलेले आहे.

महाव्यवस्थापक, शासकीय दूध योजना, पुणे/ अहमदनगर/ अकोला/ उदगीर/ नागपूर/ धुळे 
दूध उत्पादक संस्थेकडून प्राप्त होणा-या दुधाचे संकलन, प्रक्रिया, वितरण, रुपांतरण इ. कामे, दुध संस्था आणि अधिनस्थ कर्मचा-यांच्या अडी-अडचणी सोडविणे किंवा तक्रारींचे निवारण करण्यासंबंधी कार्यवाही करण्याची योजना प्रमुख म्हणून त्यांना अधिकार आहेत. महाव्यवस्थापक यांना सहाय्य करण्यासाठी खालील अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

i) दुग्धशाळा व्यवस्थापक 
दुग्धशाळेतील कामकाजाची संपूर्ण जबाबदारी दुग्धशाळा व्यवस्थापक यांची असते. दुग्धशाळेतील अधिनस्त अधिकारी/ कर्मचा-यांना मार्गदर्शन देणे, दुग्ध केंद्राना व आरे सरिता केंद्राना अचानक भेट देवून प्रत्यक्ष पहाणी करणे, तांत्रिक अधिकारी/ कर्मचारी यांना मार्गदर्शन करणे, टँकरमधून आलेल्या दुधाची पहाणी करणे, दुग्धशाळा सुरळीतपणे चालविण्या आवश्यक ती कार्यवाही करणे तसेच ग्राहकांमार्फत स्वच्छ, निर्भेळ व चांगल्या प्रतींचे दुध उपलब्ध होईल याबाबत दक्षा राहून आवश्यक ती कार्यवाही करणे.

ii) उप दुग्धशाळा व्यवस्थापक 
दुधाची प्रक्रिया, वितरण, अतिरिक्त दुधाची रुपांतर करणे, दुग्धजन्य पदार्थ तयार करणे व त्यासंबंधी इतर कामात दुग्धशाळा व्यवस्थापक यांना सहाय्य करणे करण्याची जबाबदारी उप दुग्धशाळा व्यवस्थापक यांची असते.

iii) दूध प्रापण व वितरण अधिकारी 
दूध व दुग्धजन्य पदार्थाचे दूध केंद्र, आरे सरिता केंद्र व अन्य संस्थांना दूध विक्रीसाठी दुधाचे वितरण करण्याची जबाबदारी दूध प्रापण व वितरण अधिकारी यांची आहे. दूध केंद्र व आरे सरिता केंद्राना अचानक भेट देणे व दूध वितरणासंबंधी आवश्यक ती उपाय योजना करणेबाबत प्रभारी व्यवस्थापक यांना सहाय्य करणे.

दुग्धशाळा व्यवस्थापक 
५०,००० लीटर/प्रति दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दुग्ध हाताळणी करणा-या दुग्धशाळांसाठी दुग्धशाळा व्यवस्थापक यांची नेमणूक करण्यात येते. पाळी व्यवस्थापक, दुग्धशाळा पर्यवेक्षक, सहाय्यक गुण नियंत्रण अधिकारी हे दैनंदिन दुध हाताळणी/प्रक्रिया/वितरण इ. कामात दुग्धशाळा व्यवस्थापक यांना सहाय्य करावे असतात.

लेखा अधिकारी 
दुग्धशाळेत काम करणा-या अधिकारी/ कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करणे, सेवापुस्तक आणि सेवा विषयक अभिलेख अद्यावत करुन ठेवणे.

अधिक्षक 
अधिक्षक हे वर्ग-३ मधील पर्यवेक्षकीय संवर्गातील पद आहे. दैनंदिन कामकाजातील प्रकरणे अधिका-यांना सादर करणे, अधिपत्याखालील वर्ग-३ व वर्ग-४ मधील कर्मचा-यांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे.

प्रमुख लिपिक 
वर्ग-३ मधील पद आहे. संबंधित प्रकरणे वरिष्ठांना सादर करणे व प्राप्त निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करणे.

लिपिक 
वर्ग-३ मधील पद आहे. संबंधित प्रकरणे वरिष्ठांना सादर करणे व प्राप्त निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करणे.

शिपाई 
वर्ग-४ मधील पद आहे. अधिकारी व इतर वरिष्ठाने दिलेल्या निर्देशानुसार काम करणे.
दूध शितकरण केंद्राची आखणी 

केंद्र प्रमुख 
दूध शितकरण केंद्रातील कर्मचा-यांच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे, प्रक्रिया दुग्धशाळांना चांगल्या प्रतींची निर्भेळ दूध पुरवठा करणे, दुग्ध संस्थांकडून येणा-या दूध टँकर्सवर लक्ष ठेवणे.

सहाय्यक गुण नियंत्रण अधिकारी 
दूध शितकरण केंद्रावर स्वीकृत होणा-या आणि इतर ठिकाणी पुरवठा होणा-या दुधाची गुणप्रत चांगली व निर्भेळ ठेवण्याची जबाबदारी सहाय्यक गुण नियंत्रण अधिकारी यांची असते.

दुग्धशाळा पर्यवेक्षक 
दूध शितकरण केंद्रावर स्वीकृत झालेल्या दुधाची प्रक्रिया, हाताळणी इ. ची जबाबदारी दुग्धशाळा पर्यवेक्षक यांची असते.

दुग्धशाळा रसायन शास्त्रज्ञ 
दूध शितकरण केंद्रावर स्वीकृतीसाठी आलेल्या दुधाची गुणवत्ता तपासणे व त्याची क्षमता निश्चित करुन त्याचा अहवाल शितकरण केंद्र प्रमुखाकडे अहवाल सादर करणे.

दुग्धप्रकल्प, दापचरी 
प्रकल्प अधिकारी 
प्रकल्पाचे कामकाज सुरळीतपणे चालविण्यासाठी वरिष्ठ शासकीय अधिका-याची प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येते. प्रकल्प अधिकारी यांना सहाय्य करण्यासाठी खालील अधिका-यांची नेमणूक करण्यात येते.

i) कृषि अधिकारी 
प्रकल्पाअंतर्गत शेतात काम करणा-या वर्ग-४ मधील कामगारांवर नियंत्रण ठेवणे, विविध शेतावर अचानक भेट देवून तेथील कामकाजाबाबत अहवाल प्रकल्प अधिकारी यांना सादर करणे, झाडे लावणे व गवताची विक्री विल्हेवाट लावणे, इ. कामे.

ii) लेखा अधिकारी 
प्रकल्पांच्या ठिकाणी कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन व भत्ता अदा करण्याबाबतची कार्यवाही करणे, तसेच त्यांचे सेवापुस्तक व सेवा विषयक अभिलेख अद्यावत ठेवणे.

प्रक्षेत्र आधिक्षक, पशु पैदास व संगोपन केंद्र, पालघर 
पशुपैदास व संगोपन केंद्र, पालघर येथे केंद्र प्रमुख म्हणून व्यवस्थापक यांची नेमणूक करण्यात येते. केंद्र प्रमुख म्हणून पशुपैदास केंद्रातील सर्व कामाची जबाबदारी व्यवस्थापक यांची आहे. त्यांना सहाय्य करण्यासाठी खालील अधिका-यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

i) कृषि अधिकारी 
शेतावर काम करणा-या कामगारांवर नियंत्रण ठेवणे, विविध शेती क्षेत्रांवर भेट देवून तेथील कामकाजाचा अहवाल व्यवस्थापकांना सादर करणे.

ii) क्षेत्र पर्यवेक्षक 
विविध क्षेत्रामध्ये काम करणा-या कामगारावर नजर ठेवणे व त्यासंबंधीचा अहवाल व्यवस्थापकांना सादर करणे.

नियंत्रक, गुरे नियंत्रण 
गुरे नियंत्रण अधिनियम-१९७६ ची अमंलबजावणी करण्याची जबाबदारी नियंत्रक, गुरे नियंत्रण यांची आहे. अधिनस्त अधिकारी/ कर्मचा-यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे व त्यांना मार्गदर्शन देणे, जनावरे बाळगणा-या व्यक्तीला परवाना देण्याबाबत अधिकारी/ कर्मचारी यांना मार्गदर्शन देणे, गुरांचा बाजार, गोरेगांव येथील कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

i) परवाना अधिकारी 
तबेले मालकांना परवाना देण्याबाबतची कार्यवाही करण्यासाठी नियंत्रक, गुरे नियंत्रण यांना सहाय्य करणे, विविध तबेल्यांना भेट देवून विगर परवाना जनावरासंबंधी किंवा अनियमिततेबाबतचा अहवाल नियंत्रक, गुरे नियंत्रण यांना सादर करणे.

आरे दुग्ध वसाहत
मुख्य कार्यकारी अधिकारी 
अधिकारी/ कर्मचारी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आहे, त्यांना सहाय्य करण्यासाठी खालील अधिका-यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

i) पशु संवर्धन अधिकारी 
आरे दुग्ध वसाहत येथील तबेलांमधील जनावरांचे आरोग्य व चिकित्सासंबंधी जबाबदारी पशु संवर्धन अधिकारी यांची आहे. आरे दुग्ध व वसाहतीतील तबेल्यांना भेट देवून तेथील कामकाजासाठी पहाणी करणे, काही अनियमितता आढळून आल्यास त्याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करणे.

ii) कृषि अधिकारी 
आरे दुग्ध वसाहतीमधील शेती विषयक कामकाजाची मुख्य जबाबदारी कृषि अधिकारी यांची आहे. शेती क्षेत्रांची पहाणी करणे, गवत (Paragrass) विक्रीसाठी निविदा मागविणेसंबंधी कार्यवाही करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर करणे, आरे दुग्ध वसाहत येथील शेती क्षेत्रांवर काम करणा-या कामगारांवर नियंत्रण ठेवणे, आरे दुग्ध वसाहतीमधील झाडांची देखभाल करणे, झाडांची तोडामोड थांबविण्यात दक्ष राहणे, नवीन झाडांची लागवड करणे, तसेच शेतीक्षेत्र व झाडांवरील अतिक्रमण प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन त्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करणे.

लेखा अधिकारी सहाय्यक कार्यकारी अधिकारी 
आरे दुग्ध वसाहतीशी संबंधीत सर्व प्रशासकीय कामात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सहाय्य करणे, अधिकारी आणि वर्ग-३ व वर्ग-४ मधील कर्मचा-यांचे सेवा विषयक अभिलेख तयार करणे, आरे दुग्धवसाहतीमधील शासकीय निवासस्थाने वाटप करण्यासंबंधी कार्यवाही व इतर प्रशासकीय कामे.

सहाय्यक सुरक्षा अधिकारी,आरे
मुख्य कार्यकारी अधिकारी,आरे यांना आरे दुग्धवसाहती येथील संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी पार पाडण्यासाठी सहाय्यक सुरक्षा अधिकारी हे सहाय्य करतात. सहाय्यक सुरक्षा अधिकारी त्यांच्या अधिनस्त कर्मचारी वर्गामार्फत संपूर्ण आरे वसाहतीच्या परिसर आणि सीमाचे रक्षण करीत असतात.

प्रमुख लिपिक 
वर्ग-३ मधील पद आहे. संबंधित प्रकरणे वरिष्ठांना सादर करणे व प्राप्त निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करणे.

लिपिक 
वर्ग-३ मधील पद आहे. संबंधित प्रकरणे वरिष्ठांना सादर करणे व प्राप्त निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करणे.

प्रमुख लिपिक
प्रशासकीय कामाशी संबंधित प्रकरणे वरिष्ठांना सादर करणे आणि प्राप्त निर्देशानुसार कार्यवाही करणे.

लिपिक 
प्रकरणे वरिष्ठांना सादर करणे आणि प्राप्त निर्देशानुसार कार्यवाही करणे.

शिपाई
अधिकारी व वरिष्ठांच्या निर्देशानुसार काम करणे. 

मराठी