कार्यालयीन प्रमाणित पध्दती

ग्राम पातळीवर प्राथमिक सहकारी दुध संस्था यांची नोंदणी :-
दुध उत्पादक शेतकरी त्यांचे गावातील प्राथमिक सहकारी दूध संस्थेचा सदस्य होऊ शकतात. प्राथमिक सहकारी दूध संस्था पंजीकृत सदस्यांकडून दूध संकलित करुन तालुका/जिल्हा दुध संघाना दूध पुरवठा करीत असतात. प्राथमिक सहकारी दुध संस्था त्याच्या तालुका/जिल्हा दुध संघाचे सदस्य होऊ शकतात.

तालुका/जिल्हा स्तरावरील तालुका/जिल्हा सहकारी दूध संघ :-
तालुका/जिल्हा दूध संघ त्यांच्या शिखर संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी दुध उत्पादक महासंघ यांचे सदस्य होवू शकतात. तालुका/जिल्हा दुध संघ त्यांचेकडे संकलित झालेल्या दुधाचा पुरवठा महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ किंवा शासकीय दूध योजनांकडे त्यांच्या आवश्यकतेनुसार करणे आवश्यक आहे. लहान शेतकरी आणि शेतमजूर यांना दुग्धव्यवसाय करण्यासाठी प्रोत्याहन दिले जाते. दुग्धव्यवसाय करण्यासाठी जास्त वेळ किंवा पैसा खर्च होत नसल्याने शेतकरी पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय करुन त्याची आर्थिक बाजू भक्कम करु शकतो.

स्वच्छ दुधाचे उत्पादन करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजना :-
केंद्र शासनाकडून दुध संघाना स्वच्छ दुधाचे उत्पादन करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिले जाते.

मराठी