दस्तऐवज

दूध शितकरण केंद्रावरील अभिलेख :-
१)दूध शितकरण केंद्रावर स्वीकृती केलेल्या दूधाचे प्रमाण आणि गुणवत्ता.
२)ज्या संस्थेकडून दुध स्वीकृत झाले आहे त्याची नावे.
३)वस्तूंचा उपयोग.
४)दुग्धशाळेना पुरवठा केलेला दूध कर्मचा-यांचा अभिलेख.

दुग्धशाळेचा अभिलेख  :-
१)दुग्धशाळेत स्वीकृत केलेल्या व त्यावर प्रक्रिया करुन वितरण केलेल्या दुधाचे प्रमाण व गुणप्रत संबंधी दस्तऐवज विक्रीसाठी दुधामध्ये मिश्रण केलेले घटक, स्थानिक स्तरावर विक्री केलेले दूध आणि त्याची गुणप्रत.
२)दूध पिशवी मध्ये पॅक करण्यासाठी वापरलेल्या फिल्म, पाणी,विद्युत इ. बाबतची माहिती.
३)दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वापरलेल्या दुधाची प्रमाण,दुग्धजन्य पदार्थाचे नाव,वितरणासाठी तयार करण्यात आलेल्या दुधाचे प्रमाणे व वितरणासाठी पाठवलेल्या दुगधजन्य पदार्थसंबंधी कागदपत्रे.
४)दुध वितरकांना,दुध संस्थांना, वितरण केलेल्या दुधाची माहिती जिल्हा/तालुका सहकारी संघाना अदा केलेल्या रक्कमेचे तपशील.
५)दुध विक्री पासून प्राप्त झालेल्या रक्कमेचे तपशील.
६)दूध पुरवठादारांना आगवू रक्कम अदा केल्याचे तपशील.
७)त्यांचेकडून प्राप्त झालेल्या दुधाची माहिती.
८)दुध पुरवठादारांकडे थकित असलेल्या दुधाची माहिती.
९)दूध संघाना अदा केलेले कमिशन.
१०)दुध वाहतूक आकार धरुन दूध स्वीकृत केलेल्या दुधासाठी अदा करण्यात आलेल्या रक्कमेचा तपशील सर्व कर्मचारी/अधिकारी यांचे सेवा विषयक अभिलेख, वेतनापोटी अदा केलेल्या रक्कमेचा तपशील इ.
११)प्रयोगशाळेतील यंत्राची यादी, वापरलेल्या रसायनांची यादी, नवीन दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी केलेले संशोधन, दुधाचे नमुने, तपासणी अहवाल इ. दुग्धशाळेमधील यंत्र सामुग्रीची यादी.
१२)खरेदी केलेले साहित्य आणि त्याचा साठा.

सहकारी दुध संस्थाचे पंजिकरण करण्याबाबतचे अभिलेख:-
१)दुध सहकारी संस्थाकडून प्राप्त झालेले अर्जांची माहिती.
इतर सहकारी संस्थाकडून प्राप्त झालेली हरकतीची माहिती.
२)सहकारी संस्थांचे नाव, त्यांची सदस्य संख्या आणि त्यांचे अन्य तपशील.
३)सुनावणी घेवून त्यावर पारित केलेले आदेश.
४)सहकारी संस्थाचे निरीक्षण केल्याचे अहवाल आणि त्याअनुषंगाने त्यांचेविरुध्द कारवाई केल्याचे तपशील.

प्राथमिक दुध संस्थाचे पंजिकरण:-
१)पंजिकरणासाठी सहकारी दुध संस्थाकडून प्राप्त झालेल्या अर्जांची माहिती त्याची सदस्य संख्या इत्यादीचे तपशीलासह.
२)अन्य प्राथमिक सहकारी दुध संस्थाकडून प्राप्त झालेल्या हरकतींचे तपशील, अधिक प्राथमिक सहकारी संस्थेचा तपशील, सुनावण घेवून त्यावर पारित केलेले आदेश इ.
३)प्राथमिक सहकारी दुध संस्थाचे निरीक्षण अहवाल व त्याअनुषंगाने त्यांचेविरुध्द कारवाई केल्याबाबतची माहिती.

तालुका सहकारी दूध संघांचे पंजिकरण :-
तालुका संघाकडून पंजिकरणासाठी प्राप्त झालेल्या अर्जाची माहिती, अन्य तालुका संघाकडून प्राप्त झालेल्या हरकतीबाबतचे पत्रव्यवहार, प्रत्येक तालुका संघाचे नांव त्यांची सदस्य संख्या व त्यांचे अन्य तपशिल इ. सुनावणी घेवून त्यावर पारीत केलेले आदेश.

जिल्हा सहकारी दूध संघाचे पंजिकरण :-
पंजिकरणासाठी जिल्हा दुध संघाकडून प्राप्त झालेल्या अर्ज, अन्य जिल्हा संघांकडून प्राप्त झालेल्या हरकतींचे पत्र, जिल्हा संघाचे नांव, त्यांची सदस्य संख्या आणि त्यांचे अन्य तपशिल तसेच सुनावणी घेवून त्यावर पारीत केलेले आदेश. प्राथमिक सहकारी दूध संस्था/तालुका संघ/जिल्हा संघ यांचे विरुध्द कारवाई केल्यासंबंधी दस्तएवज, संघांची पहाणी करणे, त्यांचे अभिलेखांची पडताळणी करणे, अभिलेखाचे निरीक्षण करणे, तसेच त्यांना दिलेले दिशा निर्देश इ. बाबतची दस्तएवज.

तालुका/जिल्हा संघांना प्रशिक्षण देणे :-
प्रशिक्षणासाठी हजर राहिलेल्या सदस्यांचे नांवे, प्रशिक्षणासाठी आलेल्या खर्चाची माहिती, प्रशिक्षणामध्ये देण्यात आलेले दिशा निर्देश तालुका/जिल्हा दुध संघाचे तपशिल.

वेतन भत्त्यांचे अभिलेख :-
प्रत्येक कर्मचा-यांचे सेवा अभिलेख, अदा केलेले वेतन, उदाहणार्थ मूळ वेतन, अन्य भत्ते, एकूण वसूल केलेली रक्कम, रजेचा लेखा, वाहतूक भत्ता देयक, वेतन नोंदवही, रोख वही, कर्मचा-यांची वार्षिक वेतनवाढ इत्यादी.

कर्मचा-यांचे सेवा अभिलेख :-
जेष्ठता यादी, पदोन्नती, बदली, रजेचा आदेश, शिल्लक रजेचा तपशील, कर्मचा-यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी, विभागीय चौकशी, न्यायालयीन प्रकरणे, तसेच कर्मचा-यांचे सर्व प्रकारचे सेवा विषयक अभिलेख इत्यादी दस्तऐवज.

वाहने आणि त्यांचे वापराबाबतचे अभिलेख :-
वाहनांचे लागबुक, वाहनांची संख्या, ऑन रोड, वाहनांची संख्या, निकाली काढण्यात आलेल्या वाहनांची संख्या, वापरात नसलेली वाहने, वाहतूक खर्च, वाहतूक दुरुस्ती, देखभाल, वापरलेल्या (इंधन) तेलाचे तपशील तसेच वाहनासंबंधी अन्य तपशील.

शासकीय इमारतीबाबतचे अभिलेख, जागा, यंत्रसामुग्री व आवारासंबंधी माहितीसह :-
१) शासकीय इमारत संबंधी सर्व माहिती, इमारतीची एकूण किंमत, क्षेत्रफळ, एफ.एस.आय. आणि वापरात घेतलेली जागा.
२) यंत्रसामुग्रीचे विवरण दुरुस्ती व देखभालीसाठी केलेला खर्च, फर्नेस ऑयलचा वापरासंबंधी माहिती.

न्यायालयीन प्रकरणांचे अभिलेख :-
न्यायालयीन प्रकरणांचे विवरण, मा. न्यायालयांडून प्राप्त झालेले आदेश, न्यायालयीन आदेशानुसार केलेली कारवाई, तक्रारींचे निरसण इ.

गुरे नियंत्रण अभिलेख:-
परवानाधारकांना देण्यात आलेल्या अनुज्ञाप्तीचे दस्तऐवज, परवानाधारकांकडे असलेल्या जनावरांची संख्या, तबेलांची पाहणी करण्यासंबंधी अभिलेख, निरीक्षण अहवाल, परवानाधारकांची नावे व यादी, कसूरदार परवानाधारकांच्या विरुध्द केलेली कारवाई तसेच त्यासंबंधी जारी केलेले निर्देश. कर्मचा-यांकडून प्राप्त तक्रारीचे अभिलेख:- कार्यालयांकडून प्राप्त तक्रारी, त्याविरुध्द केलेली कारवाई, तसेच दिलेले निर्देश.

दुध भुकटी प्रकल्पाचे अभिलेख:-
१)विविध संघ/संस्थाकडून स्वीकृत केलेल्या दूध संबंधी दस्तऐवज, शासकीय दूध भुकटी प्रकल्पांशी माहिती.
२)दूध भुकटी, लोणी इत्यादी मध्ये रुपातंर करण्यासाठी वापरलेल्या दुधाची माहिती पिशवीबंद केलेले दुग्धजन्य पदार्थ
३)पिशवीबंद करण्यासाठी वापरलेले साहित्य, विद्युतचा वापर इत्यादी.

दुध केंद्रासंबंधी अभिलेख:-
एकूण दुध केंद्राची संख्या, दुध वितरकांची यादी, वितरणासाठी पाठवलेल्या दुधाचे प्रमाण, ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी, विक्री झालेले दुध व दुग्धजन्य पदार्थ, परत आलेले दूध, (सर्कल) क्षेत्र निरीक्षकांनी दूध केंद्राना दिलेली भेटीचे माहिती. आरे

दुग्धवसाहतीमधील अभिलेख:-
एकूण अधिगृहीत केलेल्या जमिनीसंबंधी दस्तऐवज, शासकीय इमारती बांधण्यासाठी वापरलेली जागा (जमीन) गवतासाठी वापरलेली क्षेत्र (जमीन) शेती क्षेत्रांवर काम करीत असलेल्या कामगार/मजूर यांची माहिती, विविध संस्थाना दिलेली जागा, करारनामा संबंधी अभिलेख, सेवा व शर्ती, आरे दुग्धवसाहतीमध्ये काम करणा-या सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे सेवा विषयक तपशील, परवानाधारकांची यादी, परवानाधारकाडे असलेल्या जनावरांची यादी, एकूण प्राप्त होणारी अनुज्ञाप्ती शुल्क, दिवाळखोर/दोषी (डिफॉल्टर) परवानाधारकांच्या विरुध्द केलेल्या कारवाईचे तपशील.

दुग्धशाळा विज्ञान संस्था :-
आरे प्रशिक्षणांसाठी विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जासंबधीचे दस्तऐवज, प्रशिक्षणाचा कालावधी, प्रशिक्षणासाठीचा खर्च, विद्यार्थीकडून प्राप्त फी, विद्यार्थीयांचे रिझल्ट,विद्यार्थीयांना दिलेले प्रमाणपत्र इत्यादी.

दूध व दुग्धजन्य पदार्थाचे खरेदीसंबंधी अभिलेख:-
दूध खरेदी समितीच्या सभेसंबंधी दस्तऐवज दुध व दुग्धजन्य पदार्थांचे दरवाढी संबंधीचे तपशील (विवरण) दुग्धजन्य पदार्थांचे सालाना (वार्षिक)विक्री आकडेवारी.

पालघर दुग्धशाळेचा अभिलेख :-
पालघर प्रकल्पासंबंधी अभिलेख जमीन अधिग्रहण संबंधी दस्तऐवज, विविध संस्थांच्या नावे दिलेली जागा व त्यांची नांवे दिवाळखोर/दोषी (डिफॉल्टर) संस्थाचे विरुध्द केलेली कारवाई, पालघर प्रकल्पावर काम करणा-या अधिकारी/कर्मचारी यांचे सेवा विषयक तपशील, गवत व अन्य उत्पादनासंबंधी अभिलेख, एकात्मिक दुग्ध विकास प्रकल्प कार्यान्वीत करण्यासंबंधी अभिलेख.

स्वच्छ दूध उत्पादनबाबतचे अभिलेख :-
स्वच्छ दूध उत्पादनास चालना देण्यासाठी भारत सरकारने तालुका/जिल्हा संघाना ७५% अनुदान मंजूर केले आहे. भारत सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावासंबंधी दस्तऐवज, संघाना दिलेले अनुदान संबंधी अभिलेख इ.

मराठी