जनतेची भागीदारी

खालील मुद्यांवर सामान्य जनतेकडून सुझाव व प्रतिनिधीत्व विचारात विचारार्थ मागविले जातात.

दूध संकलनाचे धोरण :-
प्राथामिक दूध संस्था, तालुका संघ यांना अदा करण्यासाठी कमिशनचे दर ठरविताना, दूध संकलन दर निश्चित करताना तालुका दूध संघ आणि जनतेचे प्रतिनिधीत्व विचारात घेतले जातात. तसेच दूध शितकरण केंद्रावरील कामकाजाबाबत प्राप्त झालेले सुझाव योग्य वाटल्यास त्यानुसार कार्यवाही करण्यात येते.

विक्री किंमत निश्चित करणे :-
दूध व दुग्धजन्य पदार्थाची विक्री किंमत (दर) निश्चित करताना जनतेचे हित व त्यांचे सुझाव विचारात घेवून विक्री किंमत ठरविले जातात. साधारणत: शासनाचे दर सहकारी व खाजगी दुग्ध प्रकल्पांच्या विक्री किंमतीपेक्षा कमी ठेवले जातात.

दूध वितरणासंबंधी तक्रारीचे निरसन :-
संबंधित दुग्धशाळांचे दूरध्वनी क्रमांक जनतेसाठी देण्यात आलेले आहेत. जेथे दुध व दुग्धजन्य पदार्थाच्या गुणप्रत व इतर तक्रारीची नोंद घेतली जाते. प्राप्त तक्रारीची चौकशी करुन आवश्यक ती योग्य कार्यवाही केली जाते. एखाद्या नवीन दुग्धजन्य पदार्थ बाजारात आणताना सामान्य जनतेचे हित व त्यांचे मत विचारात घेतले जातात. कोणत्याही नवीन पदार्थाचे यश जनतेच्या स्वीकार्यतेवर अवलंबून असते. आरे दुग्धवसाहत, दापचरी व पालघर प्रकल्पांची जागा वाटप करताना जनतेचे हित व त्यांचे मत विचारात घेतले जातात.

मराठी