सहकारी संस्था

'India's Place in the Sun Would Come from the Partnership Between Wisdom of its 
Rural People and Skill of its Professionals' 

- Dr Verghese Kurien (after accepting Lifetime Achievement award at ET Awards for Corporate Excellence in 2001)
 
Why cooperative model is must for milk ?
“Milk 
is the only commodity which has to be collected twice a day, 
every day of the year. 
Thus, cooperatives are the only logical system for the dairy industry. 
About 85 % of the industry in the US, Denmark and Australia is run by cooperatives.
No other system will work for milk” -

- Dr Verghese Kurien.

सहनिबंधक  सहकारी  संस्था (दुग्ध), महाराष्ट्र  राज्य, मुंबई  कार्यालय
राज्यातील सहकार विभागातील दुग्ध सहकारी संस्थांकरीता अधिकारी पदे
विभागनिहाय कार्यरत जिल्हा /तालुका सहकारी दूध संघ यादी
विभागवार जिल्हानिहाय कार्यरत प्राथमिक सह. दूध संस्थांचा तपशील
महानंद दुग्धशाळा


सहनिबंधक  सहकारी  संस्था (दुग्ध), महाराष्ट्र राज्य, मुंबई  कार्यालय

  सदर कार्यालय हे राज्यस्तरीय कार्यालय असून या कार्यालयाअंतर्गत राज्यस्तरीय सहकारी संस्था जसे की, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्या., मुंबई (महानंद), सहकारी संस्था असून निबंधक म्हणून त्यांच्यावर वैधानिक तसेच पर्यवेक्षकीय नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी या कार्यालयावर आहे.
सहनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना वैधानिक व प्रशासकीय अधिकार प्रदान करण्यात आले असून या कार्यालयात सहकार कायद्याअंतर्गत कलम १५२ अन्वये अपिलाचे आणि कलम १५४ अन्वये पुनरिक्षण अर्जांची सुनावणीवर आदेश पारित करण्याचे कामकाज चालते.  मा. आयुक्त दुग्धव्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालय, मा. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे व उपरोक्त नमुद कनिष्ठ कार्यालयांशी समन्वये साधणे, माहितीची देवाणघेवाण करणे, नियंत्रण ठेवणे इत्यादी कामकाज देखील अंतर्भूत आहे.

राज्यातील सहकार विभागातील दुग्ध सहकारी संस्थांकरीता अधिकारी पदे यांची माहिती पुढीलप्रमाणे

सहनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध),

कार्यक्षेत्र- महाराष्ट्र राज्य

संघीय शिखर संस्था (दुग्ध )
                |
विभागीय
उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध),

कार्यक्षेत्र- महसुली विभाग

विभागातील जिल्हा तालुका संघ (दुग्ध )
               |
सहाय्यक
निबंधक सहकारी संस्था (दुग्ध)

कार्यक्षेत्र- जिल्हा

जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्था (दुग्ध)

त्याच बरोबर या कार्यालयच्या अधिन राज्यातील ६ महसूली विभागासाठी विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) कार्यालय नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या ठिकाणी आहेत. विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात त्या महसूली विभागातील जिल्हा व तालुका सहकारी दूध संघ आहेत व त्यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्या., (महानंद) मुंबई हा राज्यस्तरीय सहकारी शिखर दूध महासंघ आहे.

विभागनिहाय कार्यरत जिल्हा /तालुका सहकारी दूध संघ यादी

तसेच, महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या ठिकाणी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) असून त्यांच्या कार्यालय क्षेत्रात जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी दूध संस्था, पशुपालन संस्था, कुक्कुटपालन संस्था व मत्स्यव्यवसाय संस्था आहेत.

राज्यातील सहकारी दुग्ध चळवळीची रचना त्रिस्तरीय आहे.

  • गाव पातळीवर प्राथमिक सहकारी दूध संस्था
  • जिल्हा/ तालुका स्तरावर सहकारी दूध संघ
  • राज्यस्तरावर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्या., (महानंद) मुंबई.

प्राथमिक सहकारी दूध संस्थांची नोंदणी सहकार कायद्यातील तरतुदीनुसार करण्यात येते व त्यांचे नोंदणी निकष शासनाच्या पदुम विभागाचा शासन निर्णय दि. ०४.०१.२००० मध्ये नमूद असून त्यानुसार जिल्ह्याच्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांचेद्वारे नोंदणी करण्यात येते.

पदुम विभागाच्या शासन निर्णय दि.१०.०७.२०१५ नुसार शासनाचे गाय व म्हैस दूध खरेदीचे किमान दर हे सर्व सहकारी दूध संस्थांना लागू करण्यात आले आहेत. तसेच दूध उत्पादक सदस्यांना संस्थेकडून दूध खरेदी देयकाची अदायगी कॅशलेस स्वरुपात थेट त्यांचे बँक खात्यात जमा होण्यासाठी योजना अंमलात आणण्यात येत आहे. मा. आयुक्त दुग्धव्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी याबाबत    दि. ०१.१२.२०१६ रोजी परिपत्रक जारी केले आहे.

विभागवार जिल्हानिहाय कार्यरत प्राथमिक सह. दूध संस्थांचा तपशील

नवी मुंबई

कार्यरत संस्था

पुणे विभाग

कार्यरत संस्था

नाशिक विभाग

कार्यरत संस्था

मुंबई

पुणे

११०८

नाशिक

३०४

ठाणे

१५८

सोलापूर

१८२७

जळगाव

५१६

रायगड

२३

सातारा

३५२

धुळे

५५

रत्नागिरी

५५

सांगली

५३३

अहमदनगर

९३९

सिंधूदूर्ग

१०७

कोल्हापूर

३९३७

नंदूरबार

एकूण

३४९

एकूण

७७५७

 एकूण

१८२०

औरंगाबाद विभाग

कार्यरत संस्था

अमरावती विभाग

कार्यरत संस्था

नागपूर विभाग

कार्यरत संस्था

औरंगाबाद

४४७

अमरावती

७०

नागपूर

६५

जालना

५४

बुलढाणा

६१

चंद्रपूर

१०

परभणी

१०९

अकोला

३१

गडचिरोली

१०

हिंगोली

२४

वाशिम

२८

भंडारा

२६४

बिड

५५६

यवतमाळ

२३

गोंदिया

१४६

नांदेड

६८

-

 

वर्धा

५१

लातूर

३४६

-

 

 

 

उस्मानाबाद

१०

 

 

 

 

एकूण

१६१४

एकूण

२१३

एकूण

५४६

राज्यातील कार्यरत प्राथमिक सहकारी दूध संस्थांचा विभागनिहाय गोषवारा पुढीलप्रमाणे आहे.

विभाग

कार्यरत संस्था

नवी मुंबई

३४९

पुणे

७७५७

नाशिक

१८२०

औरंगाबाद

१६१४

अमरावती

२१३

नागपूर

५४६

एकूण

१२२९९

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्या., (महानंद) मुंबई ही राज्यस्तरीय दूध उत्पादक शिखर संस्था आहे. महासंघाचे २५ जिल्हा व ६० तालुका दूध उत्पादक सहकारी संघ सभासद आहेत.

महानंद दुग्धशाळा
महानंदचे १) दूध भुकटी प्रकल्प, वरवंड, पुणे, २) असेप्टीक प्लँट (टेट्रापॅक व टेट्राफिनो) गोरेगांव, मुंबई व ३) दुग्धजन्य पदार्थ प्रकल्प, गोरेगांव, मुंबई हे तीन प्रकल्प आहेत. महासंघाची उत्पादने मुख्यत: मुंबईच्या बाजारपेठेत विकली जातात.

 

महानंद दुग्धशाळा  असेप्टीक प्लँट (टेट्रापॅक व टेट्राफिनो)
 

मराठी