प्रश्नावली

प्र.१ ) दुधा बाबत कायदेशीर प्रमाणके काय आहेत ?

प्र.२ ) पास्चरायझेशन म्हणजे काय ?

प्र.३ ) दुधाची गुणप्रत तपासण्यासाठी कोणत्या तपासण्या केल्या जातात ?


प्र.१ ) दुधा बाबत कायदेशीर प्रमाणके काय आहेत ?
ऊ :अन्न व तत्सम पदार्थांच्या निर्भेळ गुणप्रत राखण्यासाठी व या क्षेत्रातील सामाजिक अपराध निपटून काढण्याच्या दृष्टीने भारत सरकारने अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ लागू केला आहे. सदर कायद्यामधील तरतुदींचा भंग करणा-यास किमान ६ महिने तुरुंगवास व रु. ११०० दंड करण्याची तरतूद आहे . या कायद्यामध्ये मध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात येते.

महाराष्ट्र राज्यामध्ये अन्न व भेसळ कायद्यानुसार दुधाचे प्रमाणके खालील प्रमाणे आहेत.

दुधाचा प्रकार किमान स्निग्धांश किमान स्नि.वि.घ.घ.
गाय दूध ३.५ ८.५
म्हैस दूध ६.० ९.०
शेळी/ मेंढी दूध ३.० ९.०
प्रमाणित दूध ४.५ ८.५
टोन्ड दूध ३.० ८.५
डबल टोन्ड दूध १.५ ९.०
स्किम्ड दूध ०.५ ८.७

प्र.२ ) पास्चरायझेशन म्हणजे काय ?
ऊ :पास्चरायझेशन म्हणजे ज्या प्रक्रियेमध्ये दुधातील प्रत्येक कण किमान ६३ ०से तापमानास ३० मिनिटे वा ७२ ०से तापमानास १५ सेकंद वा इतर वेळ व तापमान यांचा मेळ साधून जो तेवढाच प्रभावी असेल अशा प्रमाणित आणि सुयोग्यरित्या संचालित सयंत्रा मध्ये गरम केले जाते. पास्चरायझेशन नंतर दूध त्वरित ५ ०से किंवा त्या पेक्षा कमी तापमानास थंड केले जाते.

प्र.३ )दुधाची गुणप्रत तपासण्यासाठी कोणत्या तपासण्या केल्या जातात ?
ऊ :दुधाची गुणप्रत तपासण्यासाठी विविध तपासण्या केल्या जातात.त्या मध्ये प्लॅटफॉर्म परीक्षा जी त्वरित दूध स्वीकृती वेळी केल्या जातात, चव व वास परीक्षा , प्रयोगशाळेत करावयाच्या तपासण्या यांचा समावेश होतो. प्रयोगशाळेत करावयाच्या तपासण्यामध्ये आम्लता तपासणी,स्निग्धांश % तपासणी ,स्नि.वि.घ.घ. तपासणी, एम.बी.आर. तपासणी, अणुजीव तपासण्या यांचा समावेश होतो

मराठी