मुख्य कार्यकारी अधिकारी,आरे दुग्ध दुग्धवसाहत

संपर्क माहिती
पशुसंवर्धन योजना

संपर्क माहिती
दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/ई मेल/फॅक्स
एन.व्ही.राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी

आरे दुग्ध वसाहत, आरे गोरेगाव, मुंबई-६५

दूरध्वनी: ०२२-२९२७२४९५
ई मेल: ceo_aarey@yahoo.co.in
फॅक्स: ०२२-२९२७२४५०

सन १९४९ मध्ये आरे दुग्ध वसाहत अस्तित्वात आली. आरे दुग्ध वसाहत मुंबई शहरापासून ३० कि.मी. लांब उत्तरेला स्थित आहे. आरे दुग्ध वसाहत एकूण ३,१६० एकर जमिनीवर व्यापलेली आहे. त्यापैकी ४०० एकर जमिन हिरवा चारा व गवत उत्पादनासाठी वापरली जाते. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अखत्यारितील विविध संस्था व उपक्रमासाठी भाडे तत्वावर (लीजवर) वापरासाठी जमिन देण्यात आलेली आहे त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

संस्थांचे नांव देण्यात आलेली जमीन (एकरमध्ये)

१. केंद्रसरकार अंतर्गत येणा-या संस्था (केंद्रीय कुक्कुट उत्पादन केंद्र, मॉडर्न बेकरी, एन.डी.डी.बी.,आर.बी.आय. )

२२९.९२
२. राज्यसरकार अंतर्गत येणा-या संस्था (पशुवैद्यकीय महाविद्यालय, राज्य राखीव पोलीस दल, म्हाडा, मुंबई महानगरपालिका, फिल्मसिटी, मत्स्यव्यवसाय,) ७२९.१२
३. रस्ते आणि इमारतीसाठी वापरलेली जमिन

४६०.००

४. विविध नाले, तलाव, जोडरस्ता तसेच नापीक असलेली जमिन

१०२०.२०

५. बागायत, पॅराग्रास, झाडी-झुडपे व गवताचे मैदानासाठी वापरलेली जमिन

५३७.००

६. सामाजिक वनीकरणसाठी वापरलेली जमिन व इतर जमिन

१८३.००

एकूण

३१६०.००

आरे दुग्धवसाहत उभारण्याचे मुख्य उद्दिष्टे

१.मुंबई शहरातील गाई व म्हशी शहरापासून लांब एका ठिकाणी स्थलांतरीत करणे.
२. मुंबई शहरातील जनतेस वाजवी दरामध्ये उत्तम प्रतिचे दूध पुरवठा करणे.
३. मुंबई शहरातील गाई व म्हशींचे वैज्ञानिक व आधुनिक पशुवैद्यकीय तंत्रज्ञानाच्या आधारे संगोपन करणे.

आरे दुग्ध वसाहतीमध्ये ३० तबेले उभारण्यात आले. प्रत्येक तबेल्यामध्ये ५०० ते ५५० जनावरे ठेवण्याची क्षमता आहे. प्रत्येक तबेल्यांमध्ये भुसा ठेवण्यासाठी गोडाऊन, चॉफ - कटींग शेड, वासरांसाठी शेड तसेच तबेलेमालक व त्यांचे कर्मचारी यांना राहण्यासाठी निवासस्थान देण्यात आलेले आहे. सन १९४९ पूर्वी मुंबई शहरामध्ये गाई व म्हशी पाळणारे खाजगी तबेलेधारकांना आरे दुग्ध वसाहतीमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. तसेच त्यांना जनावरे पाळण्यासाठी परवाने देण्यात आले. सद्य:स्थितीत आरे दुग्ध वसाहतीतील ३० गटामधील (युनिटमध्ये) तबेल्यांमध्ये १६,०७९ इतकी जनावरे आहेत. तबेलेधारकांकडून परवाना फी, व्यवसाय कर, पाणी आणि विद्युत आकार, तसेच त्यांना पुरविण्यात येत असलेल्या सोई-सुविधेसाठी नियमाप्रमाणे दर वसूल केले जाते. आरे दुग्ध वसाहतीमध्ये गाई व म्हशी दूध उत्पादित करण्याचे काम केले जातात. त्या व्यतिरिक्त आरे दुग्ध वसाहतीमधील रहिवाश्यांच्या मुलांसाठी प्राथमिक शाळा आणि तेथील जनतेसाठी चोवीस खाटा असलेले रुग्णालय दिवस-रात्र सेवा पुरविण्याचे काम करीत आहेत.

आरे दुग्ध वसाहतीतील महसूल वाढविण्यासाठी आणि तोटा कमी करण्यासाठी सन २००१-०२ पासून खालीलप्रमाणे योजना राबविण्यात येत आहेत.

 आरे दुग्ध वसाहतीमध्ये पवई, मालाड, बोरिवली, दिंडोशी, गोरेगांव, अंधेरी,  मरोळ – मरोशी येथून प्रवेश करणा-या वाहनांवर पथकर आकारला जातो.  तथापि दि.१८/०८/२०१४ पासून आरे दुग्ध वसाहतीतील दिनकरराव देसाई  मार्ग (गोरेगाव चेकनाका ते पवई चेकनाका व मरोळ चेकनाका पर्यंत ) हा  सात कि.मी. लांबीचा मुख्य रस्ता शासन मान्यतेने बृहन मुंबई  महानगरपालिकेस हस्तांतरित करण्यात आलेला आहे. सध्या रस्त्याकरिता  पथकर आकारण्यात येत नाही.
 आरे तलावाचा उपयोग बोटींगसाठी करण्यात येतो व ते निविदा मागवून  ठेक्यामार्फत भाडेतत्वावर चालविण्यास देण्यात येतो.
 आरे दुग्ध वसाहतीतील विविध गोडाऊन, व गाळे निविदा पध्दतीद्वारे भाडे  तत्वावर देण्यात आले आहेत.
 विविध ठिकाणी भाडेतत्वावर हॉटेल्स,छोटा काश्मीर (O.P. Garden) इत्यादी  भाडे तत्वावर देण्यात आले असुन प्रेक्षणीय स्थळ (Picnic Point)  शासनामार्फत चालविण्यात येते.
 
राणी एलीझाबेथ-२ यांनी रोपण केलेला अत्यंत जुना वृक्ष 
विविध स्रोतांमार्फत मिळणारे उत्पादनांची विक्री उदा.पाणी, गवती क्षेत्र, ताडी आणि शेणखत कंत्राटी / ठेका पद्धतीने करण्यात येते. 
 मुख्य कार्यकारी अधिकारी, आरे व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यरत  असलेल्या १६४  कर्मचा-यांमार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. ह्या  व्यतिरिक्त संपूर्ण आरे परिसराची निगराणी सुरक्षा विभागामार्फत ठेवण्यात  येते.
मराठी