दूध प्रापण

दूध प्रापण
जिल्हा / तालुका निहाय दुग्धशाळा
जिल्हा / तालुका निहाय शीतकरण केंद्रे


शासनाने शेतक-यांकडे उत्पादित होणारे सर्व दूध खरेदी करण्याची हमी दिलेली असून दुधाचे खरेदी दर निश्चित केलेले आहेत. प्राथमिक सहकारी दूध संस्था ग्रामीण भागात कार्यरत आहेत व तालुका/जिल्हा सहकारी दूध संघ तालुका/जिल्हा स्तरावर कार्यरत आहेत. दूध सहकारी संस्थांची जबाबदारी खालीलप्रमाणे आहे.
प्राथमिक सहकारी दूध संस्था पंजीकृत सदस्यांकडून दूध संकलीत करतात. दूध उत्पादक शेतक-यांनी निवडून दिलेल्या सदस्यांमार्फत प्राथमिक सहकारी दूध संस्थांचे प्रशासकीय कामकाज पाहिले जातात.
तसेच प्राथमिक सहकारी दूध संस्थांचे सदस्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधीमार्फत सहकारी दूध संघाचे प्रशासकीय कामकाज पाहिले जातात.प्राथमिक सहकारी दूध संस्था पंजीकृत सदस्यांकडून दूध संकलित करुन तालुका/जिल्हा संघ किंवा शासकीय दुग्धशाळांना दूध पुरवठा करीत असतात. सदर दुग्धशाळांमार्फत जनतेस दूध विक्री केली जाते किंवा दुग्धजन्य पदार्थांमध्ये रुपांतर करुन विक्री केली जाते. तालुका/जिल्हा सहकारी दूध संघ खाजगी दूध उत्पादक किंवा प्राथमिक सहकारी दूध संघाकडून दूध संकलित करुन त्यावर प्रक्रिया करुन शासकीय दुग्धशाळा, सहकारी दुग्धशाळा किंवा खाजगी दुग्धशाळांना दूध पुरवठा करीत असतात. शासकीय दुग्धशाळा व सहकारी दुग्धशाळा यांना पुरवठा केलेल्या दुधाची गुणप्रत, दूध संकलन , वितरण इ.चे अभिलेख तालुका / जिल्हा सहकारी दूध संघाकडे योग्यरित्या ठेवणे आवश्यक आहे. तालुका/जिल्हा सहकारी दूध संघांना शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे दुधाची रक्कम अदा केली जाते. त्याशिवाय सदर संघाना त्यांचा खर्च भागविण्यासाठी प्रति लिटर दराप्रमाणे कमीशन अदा केले जाते. तालुका/जिल्हा सहकारी दूध संघाने केलेला खर्च भागविण्यासाठी रक्कम अदा केल्यानंतर प्राथमिक सहकारी दूध संस्थेतील सदस्यांनी पुरवठा केलेल्या दुधाची रक्कम त्यांना अदा केली जाते.
दुध उत्पादन खर्च लक्षात घेवून शासनामार्फत वेळोवेळी दूध खरेदी दर निश्चित करण्यात येतात. सदर दूध खरेदी दर कृष काळ व पुश्ट काळ या दोन कालावधीसाठी वेगवेगळया दराने निश्चित करण्यात येते. दि.१ ऑक्टोबर ते ३१ मार्चपर्यंत पुश्ट काळ व दि.१ एप्रिल ते ३० सप्टेंबर पर्यत कृष काळ धरण्यात येतो. पुश्ट काळामध्ये खरेदी दर एक रुपयाने कमी असतो आणि कृष काळामध्ये खरेदी दर एक रुपयाने जास्त असतो. सन २००३-०४ मध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने दोन्ही कालावधीमध्ये खरेदी दर सारखेच होते व सद्या ही सारखेच आहेत.
राज्यातील उच्च संकरीत जनावरांची संख्या कमी असल्याने कृत्रिम पध्दतीने गाई व म्हशींना संकरित करण्याचे काम गेल्या २५ वर्षापासून करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील दूध उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे.

जिल्हा / तालुका निहाय दुग्धशाळा
हाताळणी क्षमता-लाख लिटर प्रती दिन

अ.क्र. विभाग जिल्हा तालुका ठिकाण  क्षमता
मुंबई     वरळी ४.५
        कुर्ला ४.०
        आरे २.२
नवी मुंबई रायगड खालापूर खोपोली(शिळफाटा) ०.२
      महाड महाड ०.२
    रत्नागिरी चिपळून चिपळून ०.४
      रत्नागिरी रत्नागिरी ०.२
    सिंधूदुर्ग कणकवली वागदे(गोपुरी) ०.२
अमरावती अमरावती अमरावती अमरावती ०.५
    अकोला अकोला अकोला १.५
    यवतमाळ यवतमाळ यवतमाळ ०.२
    बुलढाणा नांदुरा नांदुरा ०.५
औरंगाबाद औरंगाबाद औरंगाबाद औरंगाबाद ०.५
    परभणी परभणी परभणी ०.५
    नांदेड नांदेड नांदेड १.०
    बीड बीड बीड १.०
    लातूर उदगीर उदगीर १.०
    उस्मानाबाद भूम भूम ०.५
नागपूर नागपूर नागपूर नागपूर १.००
    गोंदिया गोंदिया गोंदिया ०.२
    वर्धा वर्धा वर्धा ०.५
    चंद्रपूर चंद्रपूर चंद्रपूर ०.५
नाशिक नाशिक नाशिक नाशिक ०.५
    नाशिक वणी वणी ०.२
    धुळे धुळे धुळे १.०
    नंदुरबार नंदुरबार नंदुरबार ०.५
    अहमदनगर अहमदनगर अहमदनगर १.०
    जळगाव जळगाव चाळीसगाव ०.१६
पुणे पुणे पुणे पुणे १.२
    सातारा सातारा सातारा १.०
    सांगली मिरज मिरज २.२
    सोलापूर सोलापूर सोलापूर ०.५
जिल्हा / तालुका निहाय शीतकरण केंद्रे
हाताळणी क्षमता-लाख लिटर प्रती दिन
अ.क्र. विभाग जिल्हा तालुका ठिकाण  क्षमता
नवी मुंबई ठाणे मुरबाड सरळगाव ०.१
    रत्नागिरी डहाणू दापचरी ०.२
      लांजा लांजा ०.०५
      संगमेश्वर सडवली ०.०५
    सिंधूदुर्ग सावंतवाडी कोलगाव ०.०५
अमरावती अमरावती अचलपुर अचलपुर ०.०४
      मोर्शी मोर्शी ०.०४
      चिखलदरा सेमोडाह ०.०५
      चांदूर रेल्वे चांदूर रेल्वे ०.०५
    वाशीम वाशीम वाशीम ०.१
      कारंजालाड कारंजालाड ०.०५
    यवतमाळ पुसद पुसद ०.१
      पांढरकवडा पांढरकवडा ०.०५
      उमरखेड धनकी ०.०५
    बुलढाणा मोताळा मोताळा ०.०५
      चिखली चिखली ०.१
औरंगाबाद औरंगाबाद शिलोड शिलोड ०.०४
      विजापूर विजापूर ०.०२
      पैठण पैठण ०.०२
    जालना जालना जालना ०.१
      जाफ्राबाद मोहरा ०.१
    परभणी गंगाखेड गंगाखेड ०.१
      जिंतूर जिंतूर ०.१
    हिंगोली हिंगोली हिंगोली बंद
    नांदेड बिलोली नरसी ०.१
      लोहा लोहा ०.०४
      देगलूर काराखेड ०.०४
      भोकर भोकर बंद
      हदगाव हदगाव ०.०२
      किनवड किनवड बंद
    बीड अस्टी कडा ०.०३
      आंबेजोगाई आंबेजोगाई ०.१
      शिरूर शिरूर ०.०२
    लातूर अहमदपूर अहमदपूर बंद
      निलंगा निलंगा ०.१
      औसा औसा ०.०२
      शिरूर शिरूर (तालुका.) ०.०२
    उस्मानाबाद उमरगा उमरगा ०.०२
      उस्मानाबाद उस्मानाबाद ०.१
नागपूर नागपूर कडोल कडोल ०.१
      रामटेक मनसर ०.१
      उमरेड उमरेड ०.१
    भंडारा भंडारा भंडारा ०.२
      तुमसर तुमसर ०.१
    गोंदिया सदकार्जुनी कोह्परा ०.१
      सातगाव सातगाव ०.०५
    चंद्रपूर नागभीड नागभीड ०.०५
    गडचिरोली चिमूर खादसंगी बंद
      गडचिरोली कनेरी ०.०५
      अहेरी अलापली बंद
नाशिक नाशिक चांदवड चांदवड ०.१
    धुळे साक्री साक्री ०.२
    नंदुरबार तळोदा तळोदा ०.१
    अहमदनगर कर्जत कर्जत ०.२
      जामखेड जामखेड ०.२
      पाथर्डी तिसगाव ०.२
      पारनेर नारायणगव्हान ०.१
      अकोले अकोले बंद
      अकोले ब्राम्हणवाडा ०.१
      राजूर राजूर बंद
पुणे पुणे शिरूर कोनदापुरे ०.१
    सातारा खटाव वडूज ०.२
      खंडाळा पारगाव ०.१
      फलटण फलटण ०.४
      महाबळेश्वर महाबळेश्वर ०.३
    सांगली जट जट बंद
मराठी