दुग्धशाळा यंत्रसामुग्री

दुग्धव्यवसाय विकास विभागांतर्गत विविध दुग्धशाळा/शि. केंद्रामध्ये दुधावर प्रक्रिया करण्यासाठी/दुध थंड करण्यासाठी विविध प्रकारची सयंत्रे बसविण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने खालील सयंत्रांचा समावेश आहे.

१. मिल्क प्लेट चिलर

दुग्धशाळा/शीतकरण केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या दुधाची चांगली गुणवत्ता राखण्यासाठी ते ४ डिग्री से. तपमानापर्यंत थंड करण्याचे काम मिल्क चिलरद्वारे केले जाते. त्यामध्ये स्टेनलेस स्टिलच्या प्लेटस् असुन एका बाजुने थंड पाणी व दुस-या बाजुने दुध प्रवाहित करून दुध थंड करण्याचे कार्य केले जाते.

२. पाश्चरायझर (प्रक्रिया सयंत्र)

दुग्धशाळेमध्ये प्राप्त होणारे दुध दिर्घकाळ टिकण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे (पाश्चरायझेशन) आवश्यक असते. यामध्ये दुध ७२ डिग्री से. एवढया तापमानास गरम करुन किमान १६ सेकंद ठेवण्यात येते. नंतर ते ४ डिग्री से.पर्यंत थंड करुन साठवुन ठेवण्यात येते. सदर प्रक्रिया लुई पाश्चर या शास्त्रज्ञाने शोधुन काढल्याने त्या प्रक्रियेस पाश्चरायझेशन म्हटले जाते. या सयंत्रामध्ये दुध गरम पाण्याच्या सहाय्याने गरम केले जाते व काही सेकंदानंतर थंड पाण्याद्वारे थंड केले जाते. दुध योग्य त्या तापमानास गरम होण्या-साठी तसेच योग्य त्या तापमानास प्रक्रिया न झालेले दुध प्रक्रिया सयंत्रातून पुढे जाऊ नये यासाठी सदर सयंत्रात आवश्यक ते ऍटोकंट्रोल्स बसविलेले असतात.

३. होमोजिनायझर

दुधामध्ये असलेले फॅट ग्लोबुल्स संपूर्ण दुधामध्ये समप्रमाणात मिसळण्यासाठी त्याचे अत्यंत सुक्ष्म कणामध्ये (२ मायक्रॉनपेक्षाही कमी व्यास) रूपांतर सदर सयंत्राद्वारे केले जाते. यामध्ये हाय प्रेशर पंप व होमोजिनायझेशन व्हॉल्वचा समावेश असतो. सदर प्रक्रियेमुळे फॅट ग्लोबुल्सचे आकारमान कमी झाल्याने आणि दुधाच्या संपूर्ण आकारमानामध्ये ते समप्रमाणात मिसळत असल्याने दुधाचा पिवळेपणा कमी होतो व फॅट ग्लोबुल्स एकत्र येऊन दुधाच्या वरील पृष्ठ भागावर थर जमण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे टँकरमधून वाहतूक करताना टँकरमधील दूधातील फॅटचे प्रमाण सर्वत्र समान राहण्यास मदत होते.

४. क्रिम सेपरेटर

अतिरिक्त दुधाचे मलईवरहित दुध भुकटीमध्ये रूपांतर करतांना दुधामधील जास्तीचे फॅट काढुन स्कीम मिल्क वेगळे करण्यासाठी क्रिम सेपरेटर या सयंत्राचा उपयोग करण्यात येतो. यामध्ये दुधास गोलाकार गती दिली जाते व सेंट्रीफ्युगल फोर्समुळे दुधातील फॅट व स्कीम मिल्क याच्या विशिष्ट गुरूत्वातील फरकामुळे ते स्वतंत्र होतात.स्वतंत्र केलेल्या फॅटपासुन नंतर बटर व घी हे पदार्थ तयार केले जातात व स्कीम्ड मिल्कपासून दूध भुकटी तयार करण्यात येते. सदर सयंत्रामध्ये दुधाचे स्टॅडरायझेशन/क्लॅरीफिकेशनची ही सोय असते .यामध्ये अनुक्रमे आवश्यक त्या फॅटचे दुध निर्माण करणे तसेच दुधामध्ये असलेला कचरा इ.बाहेरील अंश काढुन टाकण्यात येतात.

५. पाऊच सयंत्र

दुधाचे वितरण करण्यासाठी ते पिशवीबंद करण्यात येते. सदर सयंत्राद्वारे आवश्यक त्यापरिमाणाचे दुध (२००/५००/१००० मिली. लिटर)पॉलिथिलीन फिल्ममध्ये भरण्यात येते. या सयंत्राद्वारे आवश्यक त्या क्षमतेची पॉलिफिल्मची पिशवी बनविणे, ती भरणे व सिलिंग करणे या क्रिया स्वयंचलित पध्दतीने केल्या जातात. सुगीच्या हंगामात प्राप्त झालेल्या दुधाचा विनियोग करण्यासाठी त्याचे दुध भुकटीमध्ये रूपांतर केले जाते. विभागामध्ये एकंदर ४ ठिकाणी दुध भुकटी प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. १. शासकीय दूध योजना अकोला- १५ मे.टन/दिनी क्षमता. २. शासकीय दूध योजना उदगीर - १० मे.टन/दिनी क्षमता. ३. शासकीय दूध योजना मिरज - १० मे.टन/दिनी क्षमतेचे २ प्लँटस् ४. शासकीय दूध योजना नागपूर- ५ मे.टन/दिनी क्षमता

दुग्धशाळेत उभारलेल्या महत्वाच्या यंत्र सामुग्रींची यादी
अ.क्र. योजनेचे नाव पाश्चरायझर (क्षमता: ली./तास) क्रिम सेपरेटर होमोजिनायझर बॉइलर/गरम पाणी निर्माण करणारे यंत्र (एच.डब्लू.जी.)
१)मुंबई विभाग :
शा.दू.यो.खोपोली ५,००० x १ -- ५,००० x १
२,००० x १
एच.डब्लू.जी. १
लाख की.कॅ.x २ नग
शा.दू.यो.चिपळून ५,००० x १ -- २,००० x १ -“-

शा.दू.यो.रत्नागिरी

५,००० x १ -- -- -“-
शा.दू.यो. कणकवली ५,००० x १ ५,००० x १ -- १ लाख की.कॅ.x १ नग.
२) पुणे विभाग :
शा.दू.यो. पुणे १०,००० x ३ ५,००० x २ १०,००० x २ आडवा २ टन x १ उभा १ नग एच.डब्लू.जी. १ लाख की.कॅ/तास
शा.दू.यो., मिरज १०,००० x ३
क्रीम पास्चर ५,००० x २
१०,००० x ४ -- ६ टन x २ ५ . टन x १ एच.डब्लू.जी.x १
१.५ लाख की.कॅ/तास
शा.दू.यो. सोलापूर ५,००० x १
३,००० x १
-- -- ५.००० x १ H.W.G.x २ नग
१ लाख की.कॅ/तास
शा.दू.यो.., सातारा ७,५०० x १ -- -- २ नग
३) नाशिक विभाग :
शा.दू.यो.., नाशिक ५,००० x १
१०,००० x १
५,००० x १ ५,००० x १ एच.डब्लू.जी.x २ नग
१.५ लाख की.कॅ/तास
शा.दू.यो., अ. नगर १०,००० x १ चीलर
१० ००० ली/ता.
  -- एच.डब्लू.जी.x १ नग
१.५ लाख की.कॅ/तास
शा.दू.यो.., धुळे १०,००० x १ १०,००० x १ -- एच.डब्लू.जी.x २ नग
१.५ लाख की.कॅ/तास
४) औरंबाबाद विभाग :
शा.दू.यो.., उदगीर १०,००० x २ नग १०,००० x २   ४ टन x २ नग एच.डब्लू.जी.x १ नग १.५ लाख की.कॅ/तास
शा.दू.यो. बीड १०,००० x १
५,००० x १
५,००० x १   ४ टन x १ नग
२ टन x १ नग एच.डब्लू.जी.x २ नग १.५ लाख की.कॅ/तास
शा.दू.यो.., नांदेड १०,००० x १
५,००० x १
५,००० x १ २,००० x १ २ टन/ता x २ नग. एच.डब्लू.जी. – १ नग १ लाख की.कॅ/तास
शा.दू.यो., भूम ७,५०० x १ ५,००० x १   २ टन x १ नग एच.डब्लू.जी.x २ नग १.५ लाख की.कॅ/तास
शा.दू.यो.,
औरंगाबाद
वाकुम मेक ५,००० x १
५,००० x १
५,००० x १ ५,००० x १ बॉइलर २ नग ६०० कग/ता. व १.५ ट/ता. एच.डब्लू.जी.x १ नग
१ लाख की.कॅ/तास
शा.दू.यो., परभणी ५,००० x १ -- -- बॉइलर २ नग. ६०० की./ता. एच.डब्लू.जी.x १ नग
१ लाख की.कॅ/तास
५.अमरावती विभाग:
शा.दू.यो., अकोला १,५००० x २ नग
५,००० x १नग
क्रीम पास्चर. ३,००० ली/ता.-१ नग
१,५००० x ३ ५,००० x २ ८ टन x २ नग. एच.डब्लू.जी.x २ नग १.५ लाख की.कॅ/तास
शा.दू.यो., अमरावती ५,००० x १ ५,००० x १ २,००० x १ एच.डब्लू.जी.x २ नग १.५ लाख की.कॅ/तास
६. नागपूर विभाग :
शा.दू.यो., नागपूर १०,००० x १
५,००० x २
क्रीम पास्चर. २,००० x १
५,००० x ३
क्लेरीफायर ५,००० x २
१०,००० x २ ३ टन x १ नग ४ टन x १ नग
शा.दू.यो, वर्धा ५,००० x १ ५,००० x १ (क्लेरीफायर) -- एच.डब्लू.जी.(Diesel) १ नग. १ लाख की.कॅ /तास
शा.दू.यो., चंद्रपूर ५,००० x २ -- ५,००० x २ एच.डब्लू.जी.x २ नग ४ लाख की.कॅ/तास
शा.दू.यो., गोंदिया ५,००० x १ -- -- एच.डब्लू.जी.-१ नग १.५ लाख की.कॅ/तास
  आरे दुग्धशाळा
वरळी दुग्धशाळा
कुर्ला दुग्धशाळा
१०,००० x २
१०,००० x ३
१८,००० x २
१०,००० x ३
१०,००० x २
१८,००० x ३
१०,००० x २
१०,००० x ३
१८,००० x २
४ टन - १ नग ३ टन - १ नग
८ टन - १ नग ६ टन - १ नग
४ टन - ३ नग
मराठी