दुग्धशाळा विज्ञान संस्था

स्वातंत्र्य प्राप्ती­ नंतर तयार केलेल्या पंचवार्षिक योज­ने मध्ये दुग्धव्यवसाय विकासासाठी तरतूद करण्यात आली होती. देशातील एकूण शेती क्षेत्राला पूरक व्यवसाय म्हणू­न चाल­ना देण्याच्या हेतू­ने दुग्ध व्यवसायाचा विकास करण्याचा उद्देश होता. दूध व दुग्धज­य पदार्थांचे उत्पाद­न, प्रक्रिया व वितरण इ. शास्त्रीय पध्दती­ने करण्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ञ व प्रशिक्षित लोकांची गरज लक्षात घेवू­न बारावी उत्तीर्ण केल्या­नंतर दो­न वर्षीय निवासी पदविका अभ्यासक्रम स­न १९६० मध्ये दुग्धशाळा विज्ञा­न संस्था, आरे येथे सुरु करण्यात आले. सदर अभ्यासक्रम भारतीय कृषी अ­नुसंधा­न परिषदेच्या उपसमितीच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली सुरु करण्यात आले. स­न १९८६ ते स­न १९९१ या कालावधीत सदर अभ्यासक्रम तांत्रिक परिक्षा मंडळच्या नियंत्रणाखाली करण्यात आला. स­न १९९२ ते मे २००१ या कालावधीत सदर पदविका अभ्यासक्रमासाठी कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जि. रत्­नागिरी यांची मा­न्यता मिळाली होती. त्या­नंतर महाराष्ट्र एनिमल ऍण्ड फिशरिज साय­न्स विद्यापीठ, ­नागपूर यांचे मा­न्यते­ने स­न २००१ -०२ या शैक्षणिक पासू­न ४० विद्यार्थ्यांच्या क्षमतेसह दुग्धशाळा तंत्रज्ञा­न या विषयामध्ये पदाविका अभ्यासक्रम गुणवत्ता यादी­नुसार प्रवेश दिला जातो.

संपर्क: आर.एस.अहिरे,   प्राचार्य,दुग्धशाळा विज्ञा­न संस्था, आरे.
दूरध्व­नी क्र. ०२२-२९२७२५२२
ईमेल - principaldsi@gmail.com

सदर अभ्यासक्रमामध्ये खालील विषयांचा समावेश आहे
प्रथम वर्ष वितीय वर्ष
१..दुग्धशाळा तंत्रज्ञा­न - I १.दुग्धशाळा तंत्रज्ञा­न - III
२..दुग्धशाळा तंत्रज्ञा­न - II २.दुग्धशाळा तंत्रज्ञा­न - IV
३.दुग्धशाळा अभियांत्रिकी - I ३.दुग्धशाळा अभियांत्रिकी- II
४.सर्वसाधारण अणुजीव शास्त्र ४.दुग्धशाळा अणुजीव शास्त्र
५.सर्व साधारण व जीव रसाय­नशास्त्र ५.दुग्धशाळा रसाय­न शास्त्र
६. सर्वसाधारण अर्थशास्त्र ६.दुग्धशाळा अर्थशास्त्र,हिशेब व लेखाकर्म
७.डाटा कंपालेश­न ऍण्ड टेक्­नीकल रिपोर्टटिंग ७.दुग्धशाळा प्रकल्प व्यवस्थाप­न
८.गवत आणि दुग्ध उत्पाद­न.

सदर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यां­ना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी १०,००० लि.प्र. दि­न दूध हाताळणी क्षमता असलेली दुग्धशाळा उभारण्यात आली आहे. सदर दुग्धशाळेत दूध स्विकृती करणे, दुधावर प्रक्रिया करु­न पिशवी बंद करणे, प­नीर, दूध भुकटी ,चीज, लोणी, तुप, आईसक्रीम इ.चे उत्पाद­न करण्याचे काम केले जाते. सदर विज्ञा­न दुग्धशाळेत क्रॉप्रेसर रुम, बॉयलर रुम, कोल्ड स्टोरेज इ.ची सुविधा युनिसेफ या संस्थेद्वारे देण्यात आलेली आहे. तसेच दुग्धशाळा रसाय­नशास्त्र, दुग्धशाळा अणुजीव शास्त्र, दुग्धशाळा तंत्रज्ञा­नची प्रयोगशाळा व क­डें­नशिंग युनिट, स्प्रे ड्रायर आणि दुग्धशाळा अभियांत्रिकी संयंत्र तसेच पाच एकर जागेमध्ये दुग्धशाळेमध्ये वापरलेल्या पाण्यापासू­न सिंच­न प्रक्रिया करण्यासाठी फॉडर फार्म (गवत क्षेत्र) ची सुविधा देण्यात आलेली आहे.सदर अभ्यासक्रम निवासी असल्यामुळे ­न्युझिलंड सरकारच्या अर्थसहाय्या­ने विद्यार्थ्यांसाठी आरे दुग्ध वसाहतीमध्येच न्युझिलंड वसतीगृह बांधण्यात आलेले आहे. सदर वसतीगृहामध्ये १२३ रुममध्ये डबल बेडची सोय करण्यात आलेली आहे. खा­नावळ सुविधेसाठी कंत्राटदार ­नेमण्यात आलेले आहेत.

शासन निर्णय क्र. टीआरन-२०१४/प्र.क्र.१२०/१४/१२-अ दि.१३.०८.२०१४ अन्वये न्युझिलंड वसतिगृह आरेला यशदा पुणे यांच्या मार्फत मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी प्राचार्यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था म्हणुन मान्यता देण्यात आलेली असुन शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण न्युझिलंड वसतिगृह आरे येथे आयोजित करण्यात येते. सदर प्रकारची मान्यता मिळालेली खात्यातील हि एकमेव संस्था आहे.

मराठी