दुग्ध प्रकल्प

दुग्धव्यवसाय विकास विभागा अंतर्गत आरे, दापचरी व पालघर येथे दुग्ध प्रकल्प आहेत.

दापचरी 

मुंबईपासून १५० किलोमिटर अंतरावर अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुग्ध प्रकल्प, दापचरीची स्थापना १९६० मध्ये करण्यात आली असून त्याकरीता २६७७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आलेले आहे. या प्रकल्पाकरीता विरोली नदीवर धरण (१३८० मिलीयन लिटर्स क्षमता ) धरण बांधण्यात आलेले आहे.प्रकल्पात गोशाळा योजनेबरोबरच वैरण बीज उत्पादन योजना व भाजीपाला योजना राबविण्यात आली होती. प्रकल्पात १७० संलग्न व १०० गावठाण पध्दतीची दुग्धव्यवसाय क्षेत्र शेतक-यांना वाटप करण्यात आलेली आहेत. प्रत्येकी एक हेक्टर दुग्धव्यवसाय क्षेत्रामध्ये १२ गायी करीता गोठा बांधण्यात आलेला आहे. राहण्याकरीता निवासस्थान आहे व हिरवा चारा उत्पादनाकरीता क्षेत्र आहे.

पालघर 

पशु पैदास व संगोपन करीता १९५१ साली पालघर केंद्राची स्थापना करण्यात आली. या करीता १४३२ हेक्टर जमीन संपादन करण्यात आलेली आहे. त्यापैकी १२६२ हेक्टरमध्ये नैसर्गिक गवताचे उत्पादन घेण्यात येत आहे. या गवताच्या विक्रीद्वारे प्रती वर्ष शासनास महसूल प्राप्त होतो. पशु पैदास व संगोपन केंद्र, पालघर येथे १९९१ पासून रोपवाटिका सुरु के ली असून या रोपवाटिकेतून आंबा, चिकू कलमांची व इतर वृक्ष रोपांची विक्री करण्यात येत आहे.

प्रकल्प अधिकारी, दापचरी
इतिहास:
सन १९६० साली दुग्ध प्रकल्प, दापचरी सुरु झाला. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी सुरवातीस ८०० कृषि केंद्रे स्थापण्याचे उद्धिष्ट होते. परंतू केवळ २७० कृषि केंद्रे शेतक-यांना वितरीत करण्यात आली. त्यात २.५ एकर जमीन व १२ दुभत्या गाईचा समावेश होता. दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी कृत्रिम रेतनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यासाठी २०००० लिटर क्षमतेचे शीतकरण केंद्र दापचरी येथे सन १९८० साली उभारण्यात आले. परंतू सध्या दूध उत्पादन कमी झाल्यामुळे दूध थंड करण्यासठी ४०० लिटर क्षमतेचा बल्क कुलर सन २००३ साली स्थापन करण्यात आला आहे. अतिरिक्त दूध आरे दुग्धशाळेत पाठविले जाते.

संपर्क माहिती
कार्यालय प्रमुखाचे नाव, पद कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/ई मेल/फॅक्स
व्ही. बी. काजळे , प्रकल्प अधिकारी ,(अति. कार्यभार)

दुग्धशाळा प्रकल्प, दापचरी, ता. डहाणू, जि.ठाणे

दूरध्वनी: ०२५२८ -२२०२०५१
ई मेल: podp.dapchari15@gmail.com
फॅक्स: -
प्रक्रिया वितरण
प्रक्रिया वितरण प्रक्रिया लिटर/ दिन वितरण लिटर/ दिन
शीतकरण केद्र ३०० १०० 

आरे केंद्रांची संख्या

केंद्राचा प्रकार सुशिक्षित बेकार अ.जा . अपंग माजी सैनिक सहकारी संस्था महिला
एक्स डेअरी - - - - - -
दूध केंद्र - - - - - -
आरे सरिता - - - - -
एनर्जी केंद्र - - - - - -
अर्ध वेळ एनर्जी केंद्र - - - - - -
एकूण - - - - -
कार्यरत कर्मचारी संख्या
वर्ग -१ (वरिष्ठ )
वर्ग -१ (कनिष्ठ )
वर्ग -२
वर्ग – ३ १६
वर्ग -४ ४३
वैयक्तिक पदे १३८
एकूण १९७
मराठी