अंदाजपत्रक

 अंदाजपत्रक(२०१६-१७)


दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या अखत्यारित लेखाशिर्ष 2404- दुग्धव्यवसाय विकास तसेच लेखाशिर्ष 2235- सामाजिक सुरक्षा व कल्याण, 7610- शासकीय कर्मचारी इ. कर्जे, 2415- कृषिविषक संशोधन व शिक्षण (04) दुग्धशाळा विकास ही लेखाशिर्ष कार्यान्वीत आहे. आगामी वित्तीय वर्षाचे वार्षिक अंदाजपत्रक (योजना व योजनेत्तर) वित्त विभागाच्या परिपत्रकान्वये दुग्धव्यवसाय विकास विभागाचे अंदाजपत्रक सादर करण्याकरिता विभागीय स्तरावर अंदाजपत्रक छाननी  कार्यक्रम तयार करण्यात येतो.  संबधीत कार्यालयाचे अंदाजपत्रक छानणीअंति काही आवश्यक त्या दुरुस्त्या सुचविल्यानंतर ते अंदाजपत्रक प्राप्त करुन मा. आयुक्त यांचे मान्यतेने शासनास सादर करण्यात येतात. त्याचप्रमाणे चालू आर्थिक वर्षातील आठमाही अंदाजपत्रक (सुधारित अंदाजपत्रक) शासनास सादर करण्यात येतो. एखाद्या लेखाशीर्षामधे अनुदान कमी पडत असल्यास पुनर्विनियोजानाद्वारे त्या लेखाशीर्षामधे अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.

दुग्धव्यवसाय विकास विभागाचे २०११ पासून योजनेत्तर वर झालेल्या खर्चाची आकडेवारी
(आकडेवारी : रुपये कोटीमध्ये)

अ.क्र. तपशिल प्रत्यक्ष झालेला खर्च मंजूर अनुदान
२०१६-१७
  २०११-१२ २०१२-१३ २०१३-१४ २०१४-१५ २०१५-१६
वेतन व मजुरी २१२.८३ २२०.०४ २२२.४१ १९८.७६ १९१.८४ २१३.२२
दूध खरेदी २३५.८५ ३०४.८७ २२३.२७ १८०.१३ २३७.१७ १९८.७८
इतर अनुषंगिक खर्च ८६.७६ ९३.३५ १८३.३८ ६६.७१ ७८.७८ ६७.१७
एकूण ५३५.४४ ६१८.२६ ६२९.०६ ४४५.६० ५३७.७९ ४७९.१७
मराठी